Bihar News : तेजस्वी यादव जोमात! निवडणुकीधीच व्हीआयपी-राजदची नवी इनिंग

Bihar News : तेजस्वी यादव जोमात! निवडणुकीधीच व्हीआयपी-राजदची नवी इनिंग

Bihar News : बिहारच्या राजकारणात मागील काही दिवसांत दोन (Bihar News) महत्वाच्या घडामोडी घडल्या. एक घडामोड सत्ताधारी आघाडीला झटका देणारी ठरली तर दुसरी बातमी विरोधी महागठबंधनला बळ देणारी ठरली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या घटना घडल्याने बिहारच्या राजकारणात याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. सत्ताधारी आघाडीतील लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी जागावाटपात मनमानी निर्णय घेतल्याने प्रदेश आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी राजीनामे दिले. या प्रकाराची चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी प्रमुख विरोधी पक्ष राजदने नवीन मित्र जोडला.

लालू प्रसाद यादव यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर तेजस्वी यादव यांनी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत आरजेडी विकासशील इंसान पार्टीला सोबत घेत असल्याचे जाहीर केले. मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही व्हीआयपी पक्षाला तीन जागा दिल्या असल्याचे यादव यांनी यावेळी सांगितले. झंझारपुर, गोपालगंज आणि मोतीहारी या तीन जागा विकासशील इंसान पार्टीला देण्यात आल्या. यानंतर मुकेश सहनी यांचे कौतुक करत तेजस्वी यादव यांनी त्यांचे आघाडीत स्वागत केले.

Bihar Politics : PM मोदींच्या सभेत चिराग ‘इन’ नितीश ‘आऊट’ बिहार NDA मध्ये पुन्हा धुसफूस?

यानंतर मुकेश सहनी यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली. आमच्या सहकार्याने सरकार स्थापन झाले आणि आम्हालाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र आता आम्ही महागठबंधनमध्ये सहभागी झालो आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत महागठबंधन राज्यातील 40 पैकी 40 जागा जिंकेल असा विश्वास सहनी यांनी व्यक्त केला.

याआधी आरजेडीने मुकेश सहनी यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता की त्यांचा पक्ष आरजेडी मध्ये विलीन करा मात्र सहनी यांनी हा प्रस्ताव स्पष्ट शब्दांत नाकारला. बिहारमध्ये महागठबंधनमध्ये जागावाटप निश्चित झाले आहे. या जागावाटपात लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला सर्वाधिक म्हणजे 26 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 9 जागा मिळाल्या आहेत तर डाव्या पक्षांना 5 जागा देण्यात आल्या आहेत. आरजेडीने 26 मधील 3 जागा मुकेश सहनी यांच्या पक्षाला देण्याची घोषणा केली आहे.

Bihar Politics : उमेदवार निवडीत पॉलिटिक्स; एकाच वेळी 22 नेत्यांनी सोडली चिराग पासवानांची साथ

दरम्यान, मुकेश सहनी यांच्या प्रवेशाने महागठबंधनची ताकद वाढणार आहे. राज्यात लहान पक्षांना सोबत घेण्याच्या दृष्टीने महागठबंधनकडून प्रयत्न केले जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आघाडीत धुसफूस वाढली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपात चिराग पासवान यांच्या पक्षाला पाच जागा देण्यात आल्या. मात्र त्यांचे काका पशुपती पारस यांना एकही जागा देण्यात आली नाही. त्यामुळे नाराज होत त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज