मोठी बातमी! आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने मोफत; हॉकी इंडियाचा मोठा निर्णय

मोठी बातमी! आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने मोफत; हॉकी इंडियाचा मोठा निर्णय

Asia Cup Hockey 2025 Ticket Free : पुरुष हॉकी आशिया कप टूर्नामेंट बिहारमधील राजगीर येथे (Asia Cup Hockey 2025 ) होणार आहे. या स्पर्धेत आशिया खंडातील हॉकी संघ सहभागी होणार आहेत. येत्या 29 ऑगस्टपासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेआधीच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेतील सामन्यांचे तिकीटांसाठी प्रेक्षकांना कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. कारण तिकीट मोफत आहे.

या निर्णयाची माहिती देण्यासाठी हॉकी इंडियाने (Hockey India) एक निवेदन जारी केले आहे. बिहारमधील राजगीर (Bihar News) येथे होणाऱ्या आशिया कप हॉकी स्पर्धेतील सर्व सामने फ्री राहतील. 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 पर्यंत या स्पर्धा होणार आहेत. राजगीर येथे नवीन हॉकी स्टेडियम तयार करण्यात आले आहे. या स्टेडियमवर सामने होणार आहेत.

क्रिकेट नंतर हॉकी! भारतात जाण्याआधी परवानगी घ्या; पाकिस्तान सरकारचे आदेश

असे करा तुमचे तिकीट बूक

सामन्यांचे तिकीट बूक करण्यासाठी www.ticketgenie.in या हॉकी इंडियाच्या अॅपवर जाऊन तिकीट बूक करू शकता. येथील प्रोसेस पूर्ण केल्यानंतर वर्चुअल तिकीट मिळेल. तिकीट बूक करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली आहे. त्यामुळे हॉकी प्रेक्षकांना वर्चुअल तिकीट मिळण्यात कोणतीही अडचण जाणवणार नाही असा विश्वास हॉकी इंडियाने व्यक्त केला आहे.

भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक

केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मंडाविया यांनी सोमवारी हॉकी आशिया कप ट्रॉफीचे अनावरण केले. ही स्पर्धा बिहारमधील राजवीर येथे 29 ऑगस्ट 7 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत भारतीय हॉकी टीमचा पहिला सामना 29 ऑगस्ट रोजी चीन विरुद्ध होणार आहे. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी दुसरा सामना जपान विरुद्ध आणि तिसरा सामना 1 सप्टेंबरला कझाकस्तान विरुद्ध होणार आहे.

या स्पर्धेत भारत अ गटात आहे. या गटात चीन, जपान आणि कझाकस्तानही आहेत. ब गटात चीनी ताइपे, मलेशिया, साउथ कोरिया आणि बांग्लादेश आहेत. पाकिस्तान (Pakistan Hockey) या स्पर्धेत खेळणार नाही. पाकिस्तान बाहेर पडल्यानंतर बांग्लादेशला सहभागी (Bangladesh) करून घेण्यात आले.

भारताला धक्का! कॉमनवेल्थ स्पर्धांतून हॉकी, क्रिकेट, कुस्ती अन् बॅडमिंटन आऊट

follow us
  • fb
  • instagram
  • youtube