IND vs PAK Hockey: ‘चक दे इंडिया’ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा 2-1 धुव्वा 

  • Written By: Published:
IND vs PAK Hockey: ‘चक दे इंडिया’ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा 2-1 धुव्वा 

IND vs PAK Hockey:  आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा 2-1 ने (IND vs PAK Hockey) पराभव करत सलग पाचव्या विजयाची नोंद केली आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल केले तर पाकिस्तानकडून अहमद नदीमने (Ahmed Nadeem) गोल केला.

या सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली होती मात्र पाकिस्तानकडून अहमद नदीमने 07 व्या मिनिटाला फिल्ड गोल करत पाकिस्तानला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने (Harmanpreet Singh) 12व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने गोल करून या सामन्यात बरोबरीत आणले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये पुन्हा एकदा भारतीय संघाने आक्रमक सुरुवात करत  2-1 अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये देखील भारतीय कर्णधार  हरमनप्रीत सिंगने गोल केला यानंतर पाकिस्तानला देखील एक पेनल्टी कॉर्नर मिळाला पण पाकिस्तानला याचा फायदा घेता आला नाही. तर तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले. भारतीय संघाला आणि पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता मात्र दोन्ही संघाला फायदा मिळाला नाही आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ खेळत पेनल्टी कॉर्नर जिंकला पण तो गोलमध्ये रूपांतरित करता आला नाही.

Ahan Pandey : अहान पांडे बहिणीच्या व्हिडिओतून गायब, कुटुंबाने दिला ‘हे’ कारण

तर दुसरीकडे भारताने या स्पर्धेत सलग पाचवा सामना जिंकला आहे.  भारताने चीनचा 3-0, जपानचा 5-1, मलेशियाचा 8-1 आणि कोरियाचा 3-1 असा पराभव केला आहे.

किश्तवाडचा बदला बारामूलात, सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; तीन अतिरेक्यांना कंठस्नान

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या