पाकिस्तान विरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाला धक्का, शुभमन गिलला दुखापत; नक्की काय घडलं?

सामन्याआधी सराव करताना संघाचा उपकर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला. त्याच्या हाताला मार लागला.

Shubhaman Gill

IND vs PAK Asia Cup 2025 : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना होणार आहे. या सामन्याची तयारी दोन्ही संघांनी केली आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचे टेन्शन वाढवणारी बातमी आली आहे. सामन्याआधी सराव करताना संघाचा उपकर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला. त्याच्या हाताला मार लागला. त्यामुळे आजच्या सामन्यात शुभमन गिल खेळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. यूएई विरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल चांगल्या अंदाजात दिसला. परंतु आता पाकिस्तान विरुद्धच्या महत्वाच्या सामन्याआधी त्याला दुखापत होणे टीम इंडियाचे टेन्शन वाढवणारे आहे.

आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना (IND vs PAK) होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा (Asia Cup 2025) आहे. या सामन्याची तयारी खेळाडूंनी केली आहे. नेटमध्ये सराव करत असताना शुभमन गिल मात्र दुखापतग्रस्त झाला. त्याच्या हाताला मार लागला. टीमच्या डॉक्टरांनी तपासणी केली. नंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने शुभमनची भेट घेतली. सुदैवाने गिलच्या हाताली झालेली जखम फार गंभीर नाही. काही वेळानंतर तो पुन्हा सराव करू लागला होता. तरीही तो सामन्यात खेळणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

मोठी बातमी, आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिल उपकर्णधार

तिकीट विक्री थंड

विशेष म्हणजे, भारत पाकिस्तान सामन्याची सर्व तिकीटे अजून विकलेली नाहीत. हजारो तिकीटे उपलब्ध आहेत. शुक्रवारी भारताच्या सराव सत्रातही प्रेक्षक फारसे नव्हते. दोन्ही संघांतील सामन्यात पहिल्यासारखा उत्साह दिसत नाही. बहुधा ही पहिलीच वेळ असावी की भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) मॅच हाउसफुल नाही. याआधी असे कधीच घडले नव्हते.

सध्याच्या तणावाच्या स्थितीत टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू नये अशी अनेकांची भावना आहे. त्यामुळे या सामन्याचा बहिष्कार करा असे आवाहन सोशल मीडियावरून केले जात आहे. या आवाहनाचा परिणामही दिसत आहे. बीसीसीआयचे किती अधिकारी सामना पाहण्यासाठी पोहोचतील याचा काहीच अंदाज नाही. बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची परवानगी दिली आहे. द्विपक्षीय पातळीवर मात्र असे घडणार नाही.

शाब्बास टीम इंडिया! पहिल्याच सामन्यात UAE ला चारली धूळ; फक्त 27 चेंडूतच सामना जिंकला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube