तिकीट विक्री थंड, सराव पाहण्यासाठीही प्रेक्षकांचा दुष्काळ; भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ संपली?

तिकीट विक्री थंड, सराव पाहण्यासाठीही लोकांचा दुष्काळ. भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ संपली, सराव सामन्यासाठीही लोक येईनात.

Team India 4

IND vs PAK Asia Cup 2025 : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत उद्या (रविवार) भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना होणार आहे. या सामन्याची क्रेझ किती असते याची प्रचिती अनेकदा आली आहे. परंतु, यंदा मात्र क्रेझ कमी झाल्याचे दिसत आहे. भारत-पाकिस्तान सामन्यात आता पहिल्यासारखे राहिलेले नाही. यामागे कारणही आहे. दोन्ही देशांतील तणाव आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने असतील. चार महिन्यांनंतर भारतात टी20 वर्ल्डकप पाहता उद्याचा सामना महत्वाचा आहे. परंतु, या सामन्यात उत्साहाचा अभाव आहे. लोकांना पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये असे वाटते. परंतु, ही स्पर्धा आयसीसीने आयोजित केली आहे आणि सामने यूएईत होत आहेत. त्यामुळे दोन्ही संघांत सामना होणार आहे.

Asia Cup : विजेत्या संघावर होणार पैशांचा वर्षाव; बक्षिसाच्या रकमेत एक कोटींची वाढ

तिकीट विक्री थंड

विशेष म्हणजे, भारत पाकिस्तान सामन्याची सर्व तिकीटे अजून विकलेली नाहीत. हजारो तिकीटे उपलब्ध आहेत. शुक्रवारी भारताच्या सराव सत्रातही प्रेक्षक फारसे नव्हते. दोन्ही संघांतील सामन्यात पहिल्यासारखा उत्साह दिसत नाही. बहुधा ही पहिलीच वेळ असावी की भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) मॅच हाउसफुल नाही. याआधी असे कधीच घडले नव्हते.

सध्याच्या तणावाच्या स्थितीत टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू नये अशी अनेकांची भावना आहे. त्यामुळे या सामन्याचा बहिष्कार करा असे आवाहन सोशल मीडियावरून केले जात आहे. या आवाहनाचा परिणामही दिसत आहे. बीसीसीआयचे किती अधिकारी सामना पाहण्यासाठी पोहोचतील याचा काहीच अंदाज नाही. बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची परवानगी दिली आहे. द्विपक्षीय पातळीवर मात्र असे घडणार नाही.

भारत-पाकिस्तान सामना रोखू शकत नाही; आशिया चषकावरील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

कधी होणार भारताचे सामने

आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादवच्या (Surya Kumar Yadav) नेतृत्वात टीम इंडिया मैदानात (Team India) उतरणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ ग्रुप ए मध्ये आहे. या गटात पाकिस्तान, ओमान आणि यूएई आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध झाला. या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. यानंतर 14 सप्टेंबर रोजी टीम इंडिया पाकिस्तानला (India vs Pakistan) भिडणार आहे. यानंतर 19 सप्टेंबरला ओमान विरुद्ध भारताचा सामना आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube