भारताला धक्का! कॉमनवेल्थ स्पर्धांतून हॉकी, क्रिकेट, कुस्ती अन् बॅडमिंटन आऊट

भारताला धक्का! कॉमनवेल्थ स्पर्धांतून हॉकी, क्रिकेट, कुस्ती अन् बॅडमिंटन आऊट

Commonwealth Games 2026 : कॉमनवेल्थ खेळांचे आयोजन 2026 मध्ये ग्लासगो शहरात (Commonwealth Games 2026) होणार आहे. मंगळवारी या स्पर्धांबाबत मोठी घोषणा करण्यात आली. या इवेंटचे आयोजन 23 जुलै ते 2 ऑगस्ट या काळात स्कॉटलंडमध्ये होणार आहे. यामध्ये नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भारताला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ग्लासगो मध्ये होणाऱ्या या स्पर्धांमधून काही खेळ वगळण्यात आले आहेत. विशेष म्हणजे जे खेळ हटवण्यात आले आहेत त्यात भारताचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. यामध्ये हॉकी, क्रिकेट, रेसलिंग, बॅडमिंटन आणि शुटींग अशा क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

याआधी कॉमनवेल्थ स्पर्धा बर्मिंघम मध्ये झाल्या होत्या. यामध्ये 19 खेळ होते. आता यामधून हॉकी, क्रिकेट, रेसलिंग, शुटींग, बॅडमिंटन, डाइविंग, बीच व्हॉलीबॉल, रोड सायकलिंग, माउंटने बाइकिंग, रिदमिक जिमनॅस्टीक, रग्बी सेवन, स्क्वॉश, टेबल टेनिस, पॅरा टेबल टेनिस, ट्रायथलॉन आणि पॅरा ट्रायथलॉन या खेळांना वगळण्यात आले आहे.

National Sports Day : चंद्राच्या साक्षीने ध्यानसिंगचे झाले ध्यानचंद; खास आहे नावाचा किस्सा

यामध्ये कमीत कमी पाच खेळ असे आहेत ज्यामध्ये भारताची कामगिरी सरस राहिली आहे. भारतीय अॅथलिट्सने या प्रकारात पदके जिंकली आहेत. आता या खेळांना वगळण्यात आल्याने भारताला पदके जिंकण्याची संधी राहणार नाही. एकीकडे काही खेळ वगळण्यात आले असले तरी काही नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे. ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजकांनुसार यावेळी अॅथलेटिक्स, पॅरा अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, बाउल्स, पॅरा बाउल्स, स्विमिंग, आर्टिस्टीक जिमनॅस्टीक, ट्रॅक सायकलिंग, पॅरा ट्रॅक सायकलिंग, नेट बॉल, वेट लिफ्टींग आणि पॅर वेटलिफ्टिंग, बास्केटबॉल, व्हील चेअर बास्केटबॉल या खेळांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

सन 2026 मधील कॉमनवेल्थ स्पर्धा संपल्यानंतर दोन आठवड्यांनंतर लगेचच हॉकी विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांचे वेळापत्रक 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान आहे. या स्पर्धा वावरे, बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये होतील. यामुळे हॉकीला कॉमनवेल्थ गेम्समधून हटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हॉकील वगळण्यात आल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. या क्रीडा प्रकारात भारतीय संघाने तीन वेळेस सिल्व्हर मेडल आणि दोन वेळेस ब्राँझ मेडल जिंकले आहे. तर महिला हॉकी संघाने एक सुवर्णपदकासह तीन पदकांची कमाई केली आहे.

Women’s Junior Hockey Asia Cup: कोरियावर ऐतिहासिक विजय मिळवत, भारताने प्रथमच ज्युनियर महिला आशिया कप जिंकला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या