750 CIBIL स्कोअर तरीही बँकेने कर्ज नाकारलं? RBI ने सांगितली रिजेक्ट होण्याची कारणं

कोणत्याही प्रकारचं कर्ज देण्यापूर्वी बँकांकडून अर्जदाराचा सिबील स्कोअर तपासला जातो. कारण कर्ज मिळविण्यासाठी चांगला CIBIL स्कोअर आवश्यक असतो.

  • Written By: Published:
750 CIBIL स्कोअर तरीही बँकेने कर्ज नाकारलं? RBI ने सांगितली रिजेक्ट होण्याची कारणं

Loan Rejections Despite A Cibil Score Of 750 Find Out What The RBI Says  : कोणत्याही प्रकारचं कर्ज देण्यापूर्वी बँकांकडून अर्जदाराचा सिबील स्कोअर तपासला जातो. कारण कर्ज मिळविण्यासाठी चांगला CIBIL स्कोअर आवश्यक असतो. कर्ज मिळण्यासाठी 750 सिबील स्कोअर चांगला मानला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की, 750 चा CIBIL स्कोअर असतानादेखील बँकेकडून कर्ज नाकरू शकते? असे का होते अर्ज रिजेक्ट होण्यामागची कारणं काय? RBI चे नियम काय? याबद्दल जाणून घेऊया…

750 सिबील असूनही का नाकारले जाते कर्ज?

750 पेक्षा जास्त CIBIL स्कोअर असतानाही कर्ज नाकारले जाऊ शकते. कारण बँका फक्त तुमचा स्कोअरच पाहत नाहीत तर, तुमची एकूण आर्थिक परिस्थिती, नोकरीची स्थिरता आणि दायित्वाची स्थिती देखील पाहतात. या सर्वामध्ये कोणत्याही प्रकारची तफावत असल्यास चांगला CIBIL स्कोअर असतानाही तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही.

सिबील स्कोअरसह ‘या’ गोष्टींनाही महत्त्व

कर्ज मंजूरीमध्ये तुमचे उत्पन्न आणि नोकरीची स्थिरता हे महत्त्वाचे घटक आहेत. पण, जर तुम्ही वारंवार नोकरी बदलत असाल किंवा दीर्घकाळ बेरोजगार असाल, तर, बँका तुम्हाला थोडे धोकादायक मानतात. या उलट जर तुम्ही सतत त्याच क्षेत्रात काम करत असाल आणि एखाद्या प्रतिष्ठित कंपनीशी संबंधित असाल, तर बँकांचा आत्मविश्वास वाढतो. याव्यतिरिक्त, तुमचे सध्याचे कर्जदेखील महत्त्वाचे आहे. जर तुमच्या उत्पन्नाच्या 40-50% आधीच ईएमआयमध्ये जात असतील, तर बँका नवीन कर्ज देण्यास कचरतात.

एकाचवेळी अनेक कर्जे किंवा कार्डांसाठी अर्ज करणे

बरेच लोक एकाचवेळी अनेक कर्जे किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करतात. यामुळे तुमच्या रिपोर्टमध्ये ”हार्ड इनक्वायरी” दिसून येतात, ज्या बँका आर्थिक तणावाचे लक्षण मानतात. अशा परिस्थितीत, कर्ज नाकारण्याची शक्यता वाढते. शिवाय, जर तुम्ही अर्ज करत असलेल्या बँकेकडे तुमचा खराब ट्रॅक रेकॉर्ड असेल, जसे की चुकलेले ईएमआय किंवा कर्ज परतफेडीत विलंब, या कारणांमुळेही तुमचे कर्ज नाकारले जाऊ शकते.

नवीन नियमांमध्ये दिलासा

कर्ज मिळण्यासाठी चांगला सिबील स्कोअर आवश्यक असला तरी, नवीन नियमांमुळे पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्यांसाठी किमान क्रेडिट स्कोअरची आवश्यकता काढून टाकण्यात आली आहे. याचा अर्थ बँका आता केवळ कमी सिबील स्कोअरचे कारण देऊन अर्जदाराला कर्ज नाकारू शकत नाहीत. पण, कर्ज नाकरण्यापूर्वी बँका ग्राहकांची एकूण आर्थिक परिस्थिती, कर्ज परतफेड करण्याची क्षमता आणि नोकरीची स्थिरता यासारख्या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे.

follow us