IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? टीम इंडियाच्या गोटात तणाव; कोच गंभीरने..
देशभरातून होत असलेला विरोध पाहता टीम इंडियाच्या गोटातूनही या सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

IND vs PAK Asia Cup 2025 : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. मात्र त्याआधीच भारतात वातावरण प्रचंड तापले आहे. जनतेच्या मनात नाराजीचा सूर आहे. लोकांनी अजून तरी नाराजी उघड केलेली नाही. मात्र सरकारच्या विरोधकांनी या मुद्द्यावर जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस आणि अन्य पक्षांकडून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या घडामोडी घडत असतानात दुबईत टीम इंडिया संभ्रमात पडली आहे. पाकिस्तान विरुद्ध खेळावं की नको असा प्रश्न निर्माण झाला आहे. देशभरातून होत असलेला विरोध पाहता टीम इंडियाच्या गोटातूनही या सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खेळाडूंनी (IND vs PAK) मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि सपोर्ट स्टाफसोबत बराच वेळ बैठक झाली. या बैठकीत देशातील सध्याच्या वातावरणाची चर्चा झाली. पाकिस्तान विरुद्धच्या आजच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा असाच सूर बहुतेक खेळाडूंचा होता. प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाने खेळाडूंना फक्त व्यावसायिक दृष्टीकोनातून सामना खेळा असा सल्ला दिला आहे. परंतु, बहुतांश खेळाडू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. सराव झाल्यानंतर ते सोशल मीडिया हाताळत असतात. सोशल मीडियावर सध्या भारत पाकिस्तान सामन्याबाबत जे वातावरण आहे. देशात जी आंदोलने होत आहेत. त्याचा परिणाम खेळाडूंवरही होत आहे.
पाकिस्तान विरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाला धक्का, शुभमन गिलला दुखापत; नक्की काय घडलं?