क्रिकेट नंतर हॉकी! भारतात जाण्याआधी परवानगी घ्या; पाकिस्तान सरकारचे आदेश
Junior Hockey World Cup 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद आता संपुष्टात आला आहे. पुढील वर्षी ही स्पर्धा (Champions Trophy 2025) पाकिस्तानात होणार आहे. पण टीम इंडिया पाकिस्तानात (Team India) जाणार नाही. भारताचे सामने दुसऱ्या देशात होणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यासाठी (Pakistan Cricket Board) तयार नव्हते. परंतु भारताने आपली भूमिका कायम ठेवली त्यामुळे आर्थिक नुकसान नको म्हणून हायब्रीड पद्धतीने स्पर्धा आयोजित करण्यास पाकिस्तान तयार झाला. परंतु हा वाद इतक्यावरच थांबेल असे मात्र दिसत नाही. कारण, दोन्ही देशांतील वादाचा परिणाम अन्य स्पर्धांवर पडू लागला आहे. ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात संघ पाठवण्याआधी परवानगी घ्यावी, असे आदेश पाकिस्तान सरकारने पाकिस्तान हॉकी फेडरेशनला (PHF) दिले आहेत.
डिसेंबर 2025 मध्ये भारतात एफआयएच ज्युनियर वर्ल्डकप स्पर्धा होणार आहेत. यासाठी पाकिस्तान संघाने देखील क्वलिफाय केलं आहे. त्यामुळे या स्पर्धेत पाकिस्तान टीम भाग घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीवरून जो वाद निर्माण झाला आहे तो पाहता यात बदल होताना दिसत आहे. पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे महासचिव राणा मुजाहिद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारच्या या आदेशाची माहिती दिली.
Champions Trophy : भारताने नकार देताच पाकिस्तानचा नवा फॉर्म्यूला; BCCI मंजूर करणार?
हॉकी फेडरेशनला टीम भारतात पाठवण्याआधी पाकिस्तान सरकारकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. म्हणजेच आता हॉकी टीम पाठवायची की नाही याचा निर्णय सरकार घेणार आहे. याआधी भारतात कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्यासाठी परवानगी कोणत्याही त्रासाविना मिळत होती. परंतु यावेळी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की टुर्नामेंटमध्ये भाग घेणे आणि टीम निवड करण्याआधी सरकारला विचारावं लागणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा वाद कारणीभूत ?
पीएचएफने यामागे नेमकं काय कारण आहे याचा खुलासा केलेला नाही. परंतु चॅम्पियन्स ट्रॉफी वादाशी याचं कनेक्शन आहे असे सांगितले जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात पाठवण्यास भारत सरकारने नकार दिला होता. सुरक्षेच्या कारणामुळे भारत सरकारने परवानगी दिली नाही असे सांगण्यात आले. यावरूनही बराच वाद झाला. मात्र आता या वादावर तोडगा काढण्यात आला आहे. फक्त चॅम्पियन्स ट्रॉफीच नाही तर याआधी मागील महिन्यात पाकिस्तानात झालेल्या ब्लाइंड टी 20 वर्ल्डकप साठी देखील भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्यास सरकारने परवानगी दिली नव्हती.
भारताला धक्का! कॉमनवेल्थ स्पर्धांतून हॉकी, क्रिकेट, कुस्ती अन् बॅडमिंटन आऊट