Lok Sabha Election : निवडून येऊ न शकणाऱ्या जागा मिळाल्या; वर्षा गायकवाडांची नाराजी

Lok Sabha Election : निवडून येऊ न शकणाऱ्या जागा मिळाल्या; वर्षा गायकवाडांची नाराजी

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024 ) आज महाविकास आघाडीचे ( MVA ) जागावाटप पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. या जागावाटपानुसार काँग्रेस पक्ष 17, उद्धव ठाकरे गट 21 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर निवडणूक लढणार आहे. मात्र या जागा वाटपावर कॉंग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad ) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

इम्रान खानची शाही बडदास्त! दर महिन्याला 12 लाखांचा खर्च, तुरुंगात स्पेशल ट्रिटमेंट

महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाला समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत. तसेच ज्या जागा आम्ही निवडून येऊ शकतो. तसेच ज्या ठिकाणी आमची ताकद आहे. त्या जागा आम्हाला न देता. ज्या जागेवर आम्ही निवडून येऊ शकत नाही. त्या जागा मिळाल्याने गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Government Schemes : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृद आरोग्य पत्रिका योजना आहे तरी काय?

त्यामध्ये विशेषतः वर्ष गायकवाड आणि काँग्रेसने दक्षिण मध्य मुंबईसाठी आग्रह धरला होता. मात्र हा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळाला. ठाकरे गटाने या ठिकाणी अनिल देसाई यांना उमेदवारी दिली आहे. तर वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड हे दोन वेळा या मतदारसंघातून खासदार राहिले आहेत.

त्याचबरोबर या जागावाटपात सांगली आणि भिवंडी या दोन मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेनेत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अखेर या तणातणीत काँग्रेस ठाकरे आणि शरद पवार गटासमोर झुकल्याचं स्पष्ट झालं आहे. यातील सांगलीची जागा शिवसेना तर भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढणार असल्याचे आज स्पष्ट झाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज