Government Schemes : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृद आरोग्य पत्रिका योजना आहे तरी काय?
Government Schemes : रासायनिक खतांचा (Chemical fertilizers)अनिर्बंध वापर कमी करुन मृद तपासणीवर आधारित, (National Sustainable Agriculture Mission)अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे, मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते(Biological fertilizers), सेंद्रीय खते, गांडूळ खत, निंबोळी/सल्फर आच्छादित युरियासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणाऱ्या खतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविली जाते.
‘पुष्पा 2’ मधील अल्लू अर्जुनच्या साडी घातलेल्या लुकचा इतिहास माहीत आहे का? वाचा सविस्तर
योजनेची प्रमुख अट : शेतकऱ्याकडे लागवडीलायक शेतजमिन असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे : जमिनीचा 7/12 उतारा.
लाभाचे स्वरूप असे : मृद आरोग्य पत्रिका.
WhatsApp ने आणला जबरदस्त फिचर; यूजर्सची होणार डबल मजा
योजनेचे घटक व त्याची माहिती : –
– जमिन आरोग्य पत्रिकेचे वितरण : जमिन सुपिकता निर्देशांक तसेच पिकांना अन्नद्रव्य वापराच्या शिफारशीसह सर्व शेतक-यांना नियतकालिक जमिन आरोग्य पत्रिकेचे वितरण.
– मृद् विश्लेषण प्रशिक्षण : कृषि विद्यापीठ / भारतीय कृषि संशोधन अनुसंधान यांच्या सहभागाने 20 मृद विश्लेषकांच्या गटासाठी एक आठवड्याचे परिचय प्रशिक्षण आयोजित करणे.
– शिफारसीनुसार अन्नद्रव्य वापरास आर्थिक सहाय्य : अन्नद्रव्येची कमतरता भरुन काढणे. तसेच पीक पध्दतीमध्ये संतुलित आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पध्दतीस चालना देणे.
– क्षमता वृध्दी आणि नियमीत सनियंत्रण व मुल्यमापन : राज्यशासनाकडून कृषी विद्यापीठ / भारतीय कृषी संशोधन अनुसंधान यांच्या सहकार्याने तांत्रिक व सहयोगी कर्मचा-यांची क्षमतावृध्दी करणे.
अभियान व्यवस्थापन : अभियान व्यवस्थपानासाठी प्रकल्प व्यवस्थापनाकरीता कृषि आयुक्तालयस्तरावर वरीष्ठ संगणक प्रोग्रामर, तांत्रिक सहाय्यक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई आदी कंत्राटी पध्दतीने नेमणूक.
या ठिकाणी संपर्क साधा : सर्व जिल्हयाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय / जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी कार्यालय.
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)