Government Schemes : श्रावण बाळ योजनेचा लाभ कसा अन् कोणाला घेता येईल?

Government Schemes : श्रावण बाळ योजनेचा लाभ कसा अन् कोणाला घेता येईल?

Government schemes : महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra)सुरु केलेल्या श्रावणबाळ सेवा राज्य निर्धारण योजनेची आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर काय आहे ही श्रावणबाळ योजना? (Shravanbal Yojana)या योजनेचे फायदे काय काय मिळतात? योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहे? अर्ज कुठे करायचा? आवश्यक कागदपत्रे कोणती? याबाबतची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. जर तुमच्या कुटुंबात ज्येष्ठ नागरिक असतील ही माहिती नक्की वाचा. कारण या योजनेचा लाभ हा ज्येष्ठ नागरिकांनाच घेता येणार आहे. राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांना श्रावणबाळ योजनेंतर्गत दरमहा आर्थिक सहाय्य्य केले जाणार आहे.

Israel Hamas War : गाझावर व्यक्त व्हायला शब्द नाहीत; डब्लूएचओच्या प्रमुखांकडून इस्त्रालयची कानउघडणी

श्रावणबाळ सेवा राज्य निर्धारण योजनेचे उद्दिष्ट्य काय?
– श्रावण बाळ योजना 2021 चे मुख्य उद्दीष्ट म्हणजे वयाच्या 65 व्या वर्षी ओलांडलेल्या वृद्धांना आर्थिक प्रोत्साहन देणे. या पेन्शन योजनेच्या माध्यमातून राज्यातील वृद्ध लोक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील आणि त्यांचे हाल कमी होतील.

राज्य सरकारच्या श्रावणबाळ योजनेचे प्रमुख उद्दिष्ट्य हे राज्यातील जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य्य करून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देणे, हे आहे. वृद्ध काळात त्यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत म्हणून सरकार दरमहा 600 रुपयांचे सरकार मदत म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात या योजनेअंतर्गत टाकणार आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘क्रू’ची हाफ सेंचुरी; तीन दिवसात बजेटचे पैसे वसूल, किती केली कमाई?

श्रावणबाळ योजनेसाठी पात्रता काय असावी?
– अर्जदार हे महाराष्ट्रातील कायमचे रहिवासी असले पाहिजेत.
– अर्जदाराचे वय 65 वर्षे किंवा अधिक असणे आवश्यक आहे.
– अर्जदाराचे वर्षिक उत्पन्न 21 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
– अर्जदाराचे नाव बीपीएल यादीमध्ये समाविष्ट केले जावे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? :
– अर्ज
– रहिवासी प्रमाणपत्र
– पासपोर्ट आकाराचे फोटो
– उत्पन्नाचे प्रमाणपत्र
– वयाचा पुरावा
– रेशन कार्ड

श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज कसा करायचा? :
सर्व इच्छुक व पात्र उमेदवार महाराष्ट्रातील श्रावण बाळ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube