PM Kisan Yojana मध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 18 हजार कोटी जमा

PM Kisan Yojana मध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 18 हजार कोटी जमा

PM Kisan Yojana : देशासह राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. कारण किसान सन्मान योजनेचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हप्त्याचा राज्यातील 85.66 लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ. सुमारे 18,666 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा आहेत. असं शिंदे म्हणाले. (CM Shinde Anounces 85.66 lack Maharashtra Farmers got 18,666 in PM Kisan Yojana)

पुण्यात NIA ची कारवाई, दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करणाऱ्या डॉक्टरला अटक

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
किसान सन्मान योजनेचा 14 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. देशातील साडे 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. हा कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाला. त्यात महाराष्ट्रातील 85.66 लाख शेतकरी आहेत. त्यांना सुमारे 18,666 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा आहेत. शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे.

केजरीवाल ते मोदी, पंतप्रधान पदासाठी पहिली पसंती कोणाला? सर्वेक्षणातून मोठा खुलासा…

2019 ला या योजनेची सुरूवात झाली. त्यानंतर आता या योजनेचा 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. मी पंतप्रधानांचे त्यासाठी आभार मानतो. सर्वसामान्य शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वर्षाला 6 हजार रूपये देण्याचा निर्णय हा ऐतिहासिक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

तसेच राज्यसरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजना यावर्षीपासून केली आहे. पुढच्या महिन्यात तोही कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 6 हजार रूपये केंद्र सरकारचे आणि 6 हजार राज्य सरकारचे असे 12 हजार मिळणार आहेत. अशी माहिती शिंदे यांनी दिली. तसेच राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी देखील त्यासाठी कार्यक्रम घेतल्याचं सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube