केजरीवाल ते मोदी, पंतप्रधान पदासाठी पहिली पसंती कोणाला? सर्वेक्षणातून मोठा खुलासा…

केजरीवाल ते मोदी, पंतप्रधान पदासाठी पहिली पसंती कोणाला? सर्वेक्षणातून मोठा खुलासा…

देशात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. आगामी निवडणुकीमध्ये भाजपने सर्वदूर आपली सत्ता खेचून आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत, तर दुसरीकडे विरोधकांनीही देशात भाजपविरोधात मोट बांधण्याची रणनीती आखली आहे. याचं कारण म्हणजे आगामी निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच देशात सर्वच पक्षांची रस्सीखेच सुरु आहे.

सरकारला ‘गतिमान’ म्हणावं तरी कसं?, आमदार तनपुरेंची खोचक टीका…

निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्षांच्या हालचाली सुरु करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहेत. जनतेलाही आगामी निवडणुकांचं वेध लागल्याचं दिसून येत आहे. पुढील निवडणुका लवकरच होणार आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे आता पुढील काही दिवसांतच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासोबतच विधानसभा निवडणुकाही पार पडणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थानचा समावेश आहे.

Varanasi Gyanvapi Mashid सर्वेक्षणाला सुप्रीम कोर्टानंतर हायकोर्टाचीही स्थगिती, 3 ऑगस्टला येणार निर्णय

या अनुषंगाने आता राजस्थानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलं आहे. कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान दौरा करीत इथल्या नागरिकांना अनेक भेटवस्तू दिल्या आहेत. त्यामुळे भाजपला आता राजस्थानातली काँग्रेसची सत्ता खेचायची असल्याचं दिसून येत आहे. अशातच एका वृत्तवाहिनीने राजस्थानात केलेला सर्वे समोर आला आहे. पंतप्रधानपदी पहिली पसंती कोणाला? या मथळ्याखाली हा सर्वे करण्यात आला होता. राजस्थानातल्या जनतेनेही या सर्वेत सामिल होत आपली पसंती कोणत्या पंतप्रधानाला हे सांगितलं आहे.

‘उद्धव ठाकरेंना ‘अल्झायमर’, न्यूरो सर्जनकडून उपचार घ्या’; वाढदिवशीच बावनकुळेंचा खोचक टोला

या सर्वेक्षणात सहभागी 63 टक्के लोकांनी सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपली पहिली पसंती असल्याचे सांगितले. तर २० टक्के लोकांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधानपदासाठी आपली निवड असल्याचे सांगितले. याशिवाय 6 टक्के लोकांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी, 2 टक्के लोकांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आपली पसंती असल्याचे सांगितले. तर 9 टक्के लोकांनी इतरांचे नाव घेतले आहे.

दरम्यान, या सर्वेनूसार देशात पुन्हा एकदा भाजपच बाजी मारणार असल्याचं दिसून येत आहे. सर्वेनूसार राजस्थानच्या जनतेला पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांनाच पहिली पसंती दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube