इम्रान खानची शाही बडदास्त! दर महिन्याला 12 लाखांचा खर्च, तुरुंगात स्पेशल ट्रिटमेंट
Imran Khan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान बऱ्याच (Imran Khan) दिवसांपासून तुरुंगात बंद आहेत. निवडणुकीच्या काळातही (Pakistan Elections) ते तुरुंगात होते. आता त्यांच्या सुरक्षेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. इम्रान खान यांच्या सुरक्षेसाठी तब्बल 12 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च केले जात आहेत. रावळपिंडीतील तुरुंग अधीक्षकांनी लाहोर उच्च न्यायालयाला सादर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
या अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या अहवालानुसार, इम्रान खान यांना तुरुंगाच्या परिसरात काही विशेष सुविधा दिल्या आहेत. याठिकाणी 50 हजार रुपये खर्च करून स्वतंत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे येथी सात हजार कैद्यांवर वॉच ठेवतात.
Pakistan : सरकारी कार्यक्रमात ‘रेड कार्पेट’ बंद; खर्च कमी करण्यासाठी पाकिस्तानचा निर्णय
इम्रान खानचे जेवण सहाय्यक अधीक्षकांच्या देखरेखीखाली स्वतंत्रपणे तयार केले जाते. द एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार इम्रान खान यांना जेवण देण्याआधी वैद्यकिय अधिकारी किंवा उपअधीक्षकांकडून त्यांची तपासणी केली जाते. त्यांना वैद्यकिय सेवा देण्यासाठी येथे सहापेक्षा जास्त डॉक्टरांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
इम्रान खान यांना एकूण 7 कोठडी दिल्या आहेत. यातील दोन कोठडीत ते राहतात. पाच सेल काही कारणांमुळे बंद आहेत. त्यांच्या कोठडीत कुणीही प्रवेश करू शकत नाही. त्यांना भेटायचे असल्यास आधी परवानगी घ्यावी लागते. या कक्षाच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Pakistan News : पाकिस्तानातील ग्वादर बंदरावर मोठा हल्ला; आठ दहशतवाद्यांचा खात्मा
अदियाला तुरुंगात दर दहा कैद्यांमागे एक कर्मचारी नेमला जातो. परंतु, खान यांच्या सुरक्षेत दोन सुरक्षा अधिकारी आणि तीन वैयक्तिक सुरक्षेसह 15 जवानांचा समावेश आहे. याशिवाय कारागृहाच्या आवारात व्यायाम यंत्रापासून करमणुकीपयर्यंत अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. न्यायालयीन कामकाजा दरम्यान आवश्यक सुरक्षा प्रोटोकॉल लागू केले जातात.