Pakistan News : पाकिस्तानातील ग्वादर बंदरावर मोठा हल्ला; आठ दहशतवाद्यांचा खात्मा

Pakistan News : पाकिस्तानातील ग्वादर बंदरावर मोठा हल्ला; आठ दहशतवाद्यांचा खात्मा

Baloch Militants Attack on Gwadar Port : पाकिस्तानातील अशांत असलेल्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदरावर (Baloch Militants Attack on Gwadar Port) मोठा हल्ला झाला आहे. हा एक मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्वादर पोर्ट अॅथॉरिटी कॉम्प्लेक्स परिसरात आठ (Pakistan News) दहशतवादी घुसले. यानंतर अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्बस्फोट केले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत होते. परंतु या संघटनेशी संबंधित माजीद ब्रिगेडने या हल्ल्याची जबबादारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात कोणत्याही नागरिकाचा मृत्यू झाला नसला तर आठ दहशतवादी मारले गेले आहेत.

या भागात पाकिस्तानच्या निवडणूक आयोगासह अनेक सरकारी कार्यालये आहेत. आधी गोळीबार नंतर बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकू आले असे येथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. या कारवाईत बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे आठ हल्लेखोर ठार झाल्याचा दावा एका पाकिस्तानी वृत्तपत्राने केला आहे.

पाकिस्तानचा अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक, 8 जणांचा मृत्यू; युद्धासारखी स्थिती, सैन्य आमनेसामने

पाकिस्तानच्या एक्सप्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्रातील वृत्तानुसार पाकिस्तान सरकारने बंदी घातलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीशी संबंधित माजीद ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

ग्वादर बंदरावर चीनच्या मदतीने अनेक कामे सुरू आहेत. चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरसाठी या बंदराचे महत्व अनन्यसाधारण आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पाच्या अंतर्गत ग्वादर बंदराचा विकास केला जात आहे. पाकिस्तान सरकारच्या दृष्टीने या भागाचे खूप महत्व आहे. परंतु, बलुचिस्तानातील रहिवाशांकडून या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. आतापर्यंत या परिसरात अनेक वेळा हल्ले झाले आहेत.

सध्या पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांत वाढ झाली आहे. सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी स्टडीजने जारी केलेल्या वार्षिक सुरक्षा अहवालात मागील 2023 या वर्षात पाकिस्तानात एकूण 789 दहशतवादी हल्ले झाले. या हल्ल्यांत 1 हजार 524 लोकांचा मृत्यू झाला आणि 1 हजार 463 लोक जखमी झाले.

44 वर्षांनंतर पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाकडून चूक मान्य, माजी पंतप्रधानांना फाशी देणं अयोग्यच

दरम्यान, याआधी पाकिस्तानी वायूसेनेने सोमवारी सकाळी अफगाणिस्तानात हवाई हल्ले केल्याने तणाव वाढल्याचे सांगितले जात आहे. यानंतर तालिबान सरकारने पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घेतले आहे. अफगाणिस्तान सरकारच्या विदेश मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. अफगाणिस्तान सरकारने देशात झालेल्या हवाई हल्ल्यांसंदर्भात पाकिस्तानी प्रभारींना समन्स बजावण्यात आला आहे. अफगाणिस्तानचे म्हणणे आहे की पाकिस्तानकडून तालिबानी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. दोन्ही देशांतील डूरंड लाइनजवळ अफगाणी सैनिकांनी पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केल्याचीही माहिती आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube