Ajit Pawar : आता साहेबांच्या सुनेला निवडून द्या; सुनेत्रा पवारांसाठी अजितदादांचं बारामतीकरांना आवाहन

Ajit Pawar : आता साहेबांच्या सुनेला निवडून द्या; सुनेत्रा पवारांसाठी अजितदादांचं बारामतीकरांना आवाहन

Ajit Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024 ) पाडव्याच्या मुहूर्तावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सुमित्रा पवार ( Sunetra Pawar ) यांची पती अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी सुनेत्रा पवारांना निवडून देण्यासाठी बारामतीकरांना आवाहन केलं. राज्यातील चर्चेतील मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. या ठिकाणी पवार कुटुंबातील उमेदवार म्हणजे सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे पाडव्याच्या मुहूर्तावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सुनेत्रा पवार यांची पती अजित पवार यांनी सुनेत्रा पवारांना निवडून देण्यासाठी बारामतीकरांना आवाहन केलं.

CM शिंदेंची बैठक वादात, काँग्रेसची तक्रार; मुख्यमंत्री कार्यालयाला निवडणूक आयोगाची नोटीस

पत्नी सुनेत्रा पवारांसाठी प्रचाराच्या मैदानात उतरल्यानंतर अजित पवारांनी भाषणादरम्यान बारामतीकरांना एक आवाहन केलं. यामध्ये ते म्हणाले की, 1991 ला तुम्ही लेकाला म्हणजे मला खासदार केलं. त्यानंतर वडिलांना म्हणजे साहेबांना ही निवडून दिलं. त्यानंतर लेकीला म्हणजेच सुप्रियालाही तीन वेळा खासदार केलं. आता साहेबांच्या सुनेला निवडून द्या. म्हणजे सगळी फिटम -फाट होईल. म्हणजे वडील, लेक आणि सूनपण खुश होईल. तसेच तुम्हीही खुश व्हाल.

Heeramandi Trailer : ‘हीरामंडी’ चा ट्रेलर कधी येणार? निर्मात्यांनी चाहत्यांनाच घातले कोडे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडे गेला आहे. अजित पवारांना पक्ष व घड्याळ चिन्ह मिळाले आहेत. तर शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. या पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. यामध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार हे संघर्ष पाहिला जात आहे. दोन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी एकमेंकाना थेट आव्हाने देत आहे.

Malaika Arora : मलायका अरोरानं 50 व्या वर्षी शेअर केला क्लासी लूक…

परंतु आता ही लढाई थेट निवडणुकीच्या मैदानात आली आहे. तीन टर्म खासदार सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत. त्यात बारामतीचे राजकारण आणखी पेटणार आहे. त्यात पवारविरुद्ध पवार असा संघर्षच पाहिला मिळणार आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांचे सख्ये बंधू श्रीनिवास पवार व त्यांचे कुटुंब हे सुप्रिया सुळेंबरोबर आहे. त्यामुळे दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ही एकप्रकारे शरद पवार विरुध्द अजित पवार अशीच लढत आहे. त्यामुळं अजित पवारांना ही जागा राखण्यात यश येणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज