Raj Thackeray : पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !

Raj Thackeray  : पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !

Raj Thackeray on Ajit Pawar Oath : आज सकाळपासूनच राज्यातील राजकारणात भुकंपसदृश्य स्थिती होती. NCP चे अनेक आमदार अजित पवारांसोबत (Ajit Pawar) सरकारमध्ये सामील होणार अशी चर्चा होती. परंतु, सरकारकडून याबाबत अधिकृत खुलासा आला नव्हता. अखेर आज दुपारी, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे ३० ते ४० आमदारांसह शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis सरकारमध्ये सहभागी झाल्यानं राज्याच्या राजकारात मोठा भुकंप झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हा शरद पवारांसाठी (Sharad Pawar) हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊत यांनी हे होणारचं होतं, असं सांगितलं. तर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाल्याची प्रतिक्रया दिली. (Raj Thackeray On Ncp Rebellion they Pawars first team left for power as soon as possible the second team will join for power)

राज ठाकरेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली. त्यांनी लिहिलं की, आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला . उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधल्याचं राज ठाकरे म्हणाले.

Video : डबल इंजिन सरकारला अजितदादांचे तिसरे इंजिन; शिंदेंकडून राष्ट्रवादीचे सरकारमध्ये स्वागत 

त्यांनी पुढं लिहिलं की, ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.

बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे. ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ? असा खडा सवाल राज ठाकरेंनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube