Video : डबल इंजिन सरकारला अजितदादांचे तिसरे इंजिन; शिंदेंकडून राष्ट्रवादीचे सरकारमध्ये स्वागत
Ekanath Shinde : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले आहेत. आता तर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या घडामोडींवर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रया समोर आली आहे.
मोठी बातमी : शिंदे सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी; राष्ट्रवादीचे 8 आमदारही शपथबद्ध
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी आज मुंबईतील राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे मी भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये स्वागत करतो. राज्यात डबल इंजिनचे सरकार होते. आता या सरकारला आणखी एक इंजिन जोडले गेल्याने ट्रिपल इंजिनचे सरकार झाले आहे. आता हे ट्रिपल इंजिनचे सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने राज्याचा विकास करील.
ते पुढे म्हणाले, जेव्हा एखाद्याला कर्तृत्ववान कार्यकर्त्याला दुय्यम स्थान दिले जाते तेव्हा अशा घटना घडतात. पण आता मी त्यांचे सरकारमध्ये स्वागत करत आहे. राज्याच्या विकासाला त्यांचा फायदाच होणार असल्याचे शिंदे म्हणाले.
राष्ट्रवादी फुटली! पवारांचा पुढचा प्लॅन काय?; राऊतांनी सांगितलं पुढचं नियोजन
महाराष्ट्राच्या राजकारणाचे मातेरे – राऊत
या घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राचे राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री. शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले, मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे राहु, होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही, असं ट्विट राऊतांनी केलं.
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde says "There is enough time to discuss about the seat sharing in the cabinet. We have come together to develop Maharashtra. They (the opposition) got 4-5 seats in Lok Sabha elections, this time they will not manage to get even those number of… pic.twitter.com/pky3p6kI5H
— ANI (@ANI) July 2, 2023