शिवसेनेचा नाही तर मी मनसेचाच अध्यक्ष राहणार; राज ठाकरेंनी ठासूनच सांगितलं

शिवसेनेचा नाही तर मी मनसेचाच अध्यक्ष राहणार; राज ठाकरेंनी ठासूनच सांगितलं

Raj Thackeray News : मी कोणत्याही शिवसेनेचा नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच (MNS) अध्यक्ष राहणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठासून सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल अनेक अफवांना ऊत आला होता. राज ठाकरे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष होणार असल्याचं बोललं जात होतं. त्यावर बोलताना राज ठाकरेंनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. दरम्यान, गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला रेडी पण, 7 मतदारसंघात धास्ती; तिकीट कुणाला मिळणार ?

राज ठाकरे म्हणाले, मी दिल्लीत अमित शाहांच्या भेटीला गेलो, तेव्हापासूनच चक्र सुरु झालं. मी दिल्लीला शाहांच्या भेटीला गेलो हे विरोधकांना कसं कळलं? मला तिथं 12 थांबण्याची वेळ आली नाहीतर माझी भेट ही दुसऱ्या दिवशी होती, मी आदल्या दिवशीच दिल्लीत पोहोचलो होतो. माध्यमांमध्ये त्यांच्या मनाप्रमाणे बातम्या चालवण्याचं काम सुरु असतं. दिल्लीतही पत्रकारांना सांगितलं की मला निवडणूक लढवायची असेल तर मी सांगूनच लढवणार आहे. मला जर शिवसेनेचा अध्यक्ष व्हायचं असतं तर तेव्हाच झालो नसतो का? मी बाळासाहेबांशिवाय कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. मी जन्माला घातलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार असल्याचं राज ठाकरे यांनी ठासून सांगितलं आहे.

Pune Crime : पुण्यात मैत्रीला काळीमा! मित्रांकडून तरूणीचं आधी अपहरण अन् खंडणी मिळवल्यानंतर…

चिन्हावर तडजोड होऊ शकत नाही :
राज ठाकरे यांनी अमित शाहांची भेट घेतली. ही राजकीय भेट असल्याचं सांगण्यात येत होतं. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये निवडणुकीबाबत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, तुम्ही आमच्या चिन्हावर निवडणूक लढवा, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, माझ्या पक्षाचं चिन्ह रेल्वे इंजिन असून ते कार्यर्त्यांनी कमावलेलं आहे, ते आयात केलेलं नाही. चिन्हाबाबत तडजोड होऊ शकत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. जागावाटपावर चर्चा झाली पण 1995 साली मी शेवटच्या जागावाटपाच्या चर्चेवर बसलो होते त्यानंतर कधीच बसलो नाही. तू दोन घे.. तीन घे.. मला ही दे.. असं मला जमत नसल्याचंही राज ठाकरेंनी थेट सांगून टाकलं आहे.

सांगली आम्हीच लढणार! विशाल पाटलांनी ठाकरे अन् राऊतांना ठणकावलं; मुहूर्तावर घोषणा होणार?

निवडणूकीच्या काळामध्ये डॉक्टर आणि नर्सेसची ड्यूटी लावण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात डॉक्टर मतदारांची नाडी आणि नर्सेस मतदारांचे डायपर बदलणार आहेत काय? राज्यातील डॉक्टर आणि नर्सेसने कोणत्याही निवडणुकीच्या ड्यूटीसाठी जाऊ नये, तुम्हाला नोकरीवरुन कोण काढतो ते मी बघतो, असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, मी कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष होणार नसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार आहे. मी जे अपत्य जन्माला घातलं त्याचाच मी अध्यक्ष राहणार आहे. मनसे हा पक्ष तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर ठामपणे उभा आहे. आज मनसेला 18 वर्ष पूर्ण झाली असल्याचंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube