एकनाथ शिंदे ‘सूरत’ला गेले माहिती नव्हतं, एक फोन आला अन्…; श्रीकांत शिंदेंना नेमकं कळालं तरी कधी?

एकनाथ शिंदे ‘सूरत’ला गेले माहिती नव्हतं, एक फोन आला अन्…; श्रीकांत शिंदेंना नेमकं कळालं तरी कधी?

MP Shrikant Shinde Interview : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कोसळलं. पुढे शिंदेनी भाजपशी हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्रिपदही मिळवलं. ही मोठी घडामोडा दोन वर्षांपूर्वी घडली होती. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येण्यासाठी काय घडामोडी घडल्या याची माहिती सगळ्यांनाच आहे. पण, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंड करणार आणि आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार याची माहिती त्यांचेच पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना नसावी, ही आश्चर्याचीच गोष्ट. पण, यात काय सत्य आहे याचा खुलासा खुद्द श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केला.

ठाण्यात युवासेनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी खासदार शिंदे यांची मुलाखत घेतली. यात श्रीकांत शिंदे म्हणाले, की एकनाथ शिंदे सूरतला जाणार हे मला माहिती नव्हते. 19 जूनला आमदारांसोबत साहेब गेले तेव्हा मलाही माहिती नव्हते. मी ज्यावेळी बातम्या पाहिल्या त्यावेळी मला समजले. त्यानंतर मला खासदार हेमंत गोडसेंचा फोन आला. एकनाथ शिंदे सूरतला गेले असे ते म्हणाले. मी म्हटलं काय चेष्टा करताय. मी कामात आहेत. पण तु्म्ही न्यूज पाहा असे त्यांनी सांगितल्यानंतर मी न्यूज चॅनेल सुरू केले. तेव्हा मला सगळं समजलं.

“मला संपवण्याचा फडणवीसांचा डाव, आता ‘सागर’ बंगल्यावरच आंदोलन”; गंभीर आरोप करत जरांगेंची मोठी घोषणा

शिंदे साहेबांनी काही प्लॅनिंग केलं नव्हतं. त्यांच्याबाबतीत ज्या गोष्टी घडत गेल्या त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला. मी रोज त्यांना भेटायचो पण आम्हाला याबाबत काहीच माहिती नव्हते. शिंदे साहेबांनी मोठी रिस्क घेतली होती. त्यांच्यावर विश्वास ठेऊन आमदार गेले होते. त्यावेळी पुढे काय होईल माहिती नव्हतं. मुलगा म्हणून मलाही टेन्शन आलं होतं. वडिलांची काळजी होती. कुटुंबातील लोक, माझे सहकारी यांनी उद्या काय होईल याची माहिती नव्हती. मागील अनेक वर्षे रिस्क घेऊनच त्यांनी शिवसेना वाढवण्याचं काम केलं. स्व. बाळासाहेबांचे विचारांचे रक्षण करण्यासाठीही त्यांनी रिस्क घेतली आणि आज पाहतोय मुख्यमंत्रिपदाला न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत, असे शिंदे म्हणाले.

शिवसेना पक्षात आता कोणतंही पद कुणासाठीही राखीव नाही. आमच्या सहकाऱ्यांना, आमच्यावर विश्वास ठेवून आलेल्या कार्यकर्त्यांना ही पदं द्यायची आहेत. प्रत्येकाने मेहनत केली पाहिजे आणि प्रत्येक जण त्या पदापर्यंत पोहोचू शकतो. आज मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांसारखे काम करण्याचा प्रयत्न करत असतो. शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात मुख्यमंत्री साहेबांनी अहोरात्र पक्षासाठी काम केले. त्यामुळे कुटुंबाला वेळ देणे शक्य झाले नाही. मात्र जेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांच्या जागी स्वतःला ठेवून पाहता, त्यावेळी मेहनतीला पर्याय नसतो असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

Sanjay Raut : ..तर सगळा देशच भाजपमुक्त होईल; राऊतांचा बावनकुळेंना खोचक टोला

मागील वेळी एकाला मंत्री करण्यासाठी किती तडजोडी केल्या गेल्या. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. राजा का बेटा राजा नहीं बनेगा. जो काबील होगा वही राजा बनेगा असं मी म्हणतो. जो मेहनत करील, पक्षाला वेळ देईल आणि लोकांचा विश्वास जिंकण्याचं काम करील त्यालाच सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

मी अपघाताने राजकारणात आलोय. मला राजकारणात येण्याची इच्छा नव्हती. पक्षाला माझी गरज होती म्हणून मी राजकारणात आलो. पक्षाने मला 2014 मध्ये उमेदवारी दिली. कारण कल्याणमधील आपला उमेदवार दुसऱ्या पक्षात गेला होता. त्यावेळी पक्षाने मला तिथून उमेदवारी दिली. या मतदारसंघातून मी अडीच लाख मतांच्या फरकाने निवडून आलो. 2019 मध्ये सुद्धा तीन लाख मतांच्या फरकाने निवडून आलो. आजही मी मतदारसंघात काम करत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज