Pune Crime : पुण्यात मैत्रीला काळीमा! मित्रांकडून तरूणीचं आधी अपहरण अन् खंडणी मिळवल्यानंतर…
Pune Crime girl kidnap and killed by friends for Extortion in Pune : पैशासाठी ( Extortion ) असो किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकदा मित्रच मित्राच्या ( girl kidnap and killed by friends ) जीवावर उठल्याच्या घटना आपण बातम्यांमध्ये आणि चित्रपट मालिकांमध्ये ऐकत असतो. मात्र अशीच एक मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात ( Pune ) घडली आहे.
कॉंग्रेस कडू कारले तर ठाकरेंची नकली सेना; पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेससह ठाकरे गटावर निशाणा
मुळची लातूरची असलेली 22 वर्षीय भाग्यश्री सुडे पुण्यातील वाघोली परिसरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. मात्र 30 मार्चच्या रात्री नऊच्या सुमारास ती फिनिक्स मॉल या परिसरातून अचानक बेपत्ता झाली. इकडे मुलीसोबत संपर्क होत नसल्याने आई-वडिलांनी थेट पोलिसांमध्ये तक्रार दिली. त्यानंतर लगेचच या मुलीच्या आई-वडिलांना खंडणीसाठी मेसेज येऊ लागले. 9 लाखांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास मुलीला मारून टाकण्याची धमकी येऊ लागली.
PM Modi : कमिशन द्या नाहीतर कामाला ब्रेक लावा, पीएम मोदींचा ‘मविआ’ सरकारवर हल्लाबोल
या प्रकरणी पोलिसांनी तपास चक्र फिरवताच एका संशयीताला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. त्यामध्ये या तरुणीच्या मित्रांनीच तिचं अपहरण करून आई-वडिलांना खंडणी मागत तिचा थेट निर्घृणपणे खूनही केला. या तरुणांनी झूम कार ॲपवरून गाडी बुक केली होती. त्यानंतर 30 मार्चच्या रात्री तिचं अपहरण केलं. त्यनंतर आई-वडिलांकडे खंडणीची मागणी केली. मात्र खंडणी मिळाल्यानंतर देखील ही मुलगी आपल्याबद्दल घरी सांगेल. या भीतीने या मित्रांनी तिचा थेट खून केला. तर पुरावा नष्ट करण्यासाठी या तरुणांनी नगर जिल्ह्यातील सुपा परिसरात एका शेतात या तरुणीचा मृतदेह पुरून टाकला होता.
Sharad Pawar: ‘… तर पाणी मिळणार नाही’ बारामतीकरांना धमकी, शरद पवारांनी वाचली चिठ्ठी
तर पोलीस तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार कर्जबाजारीपणा आणि पैशांच्या लालसेतून या तरुणांनी हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिवम या तिच्या मित्रासह तिघांना अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून या घटनेचा पुढील आणखी सखोल तपास देखील सुरू आहे.