कॉंग्रेस कडू कारले तर ठाकरेंची नकली सेना; पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेससह ठाकरे गटावर निशाणा
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरमध्ये (Chandrapur)आयोजित प्रचारसभेत कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसला कडू कारले असे म्हटले आहे. कॉंग्रेस हे कडू कारले आहे, त्यांना कशातही मिसळा ते कडूच राहणार असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी केला आहे. (Loksabha Election 2024) त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटावरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधला आहे. ठाकरेंची शिवसेना ही नकली सेना असल्याचेही पीएम मोदी म्हणाले.
Sharad Pawar: ‘… तर पाणी मिळणार नाही’ बारामतीकरांना धमकी, शरद पवारांनी वाचली चिठ्ठी
आज कॉंग्रेस पक्षाला देशाभरातील लोकांचं समर्थन राहिलं नाही. त्यामुळं आता कॉंग्रेसनं वाटा आणि राज्य करा असं धोरण अवलंबलं आहे. पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसच्या घोषणापत्रावरही जोरदार निशाणा साधला आहे. त्या घोषणापत्रात मुस्लीम लीगची भाषा वापल्याचा आरोप यावेळी पीएम मोदींना केला आहे.
इंडिया अलायन्सचे लोक भारताचे आणखी एकदा विभाजन करण्याची भाषा बोलत आहेत. इंडिया अलायन्सचे लोक दक्षिण भारताला वेगळं करण्याची धमकी देत आहेत. इंडिया अलायन्समध्ये सहभागी असलेली डीएमके पार्टी सनातन धर्माला डेंग्यू-मलेरिया म्हणून त्याचा नाश करण्याच्या गोष्टी करत आहेत.
कॉंग्रेस आणि नकली शिवसेनावाले त्यांनाच महाराष्ट्रात आणून त्यांची रॅली काढली जाते. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावरही निशाणा साधला आहे.