Varun Dhawan : यशराज फिल्म्सची हॉररपटांच्या दुनियेत एन्ट्री; वरुण धवन साकारणार भयपटाचा नायक
Varun Dhawan : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित निर्मिती संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशराज फिल्म्सने (Yash Raj Films) आता एका नव्या आणि
Varun Dhawan : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित निर्मिती संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशराज फिल्म्सने (Yash Raj Films) आता एका नव्या आणि अनोख्या चित्रपटविश्वात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेमकथा, अॅक्शन, रोमँटिक ड्रामा आणि मनोरंजनाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या यशराज फिल्म्सने आता पहिल्यांदाच हॉरर अर्थात भयपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या पहिल्यावहिल्या हॉररपटात अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
यशराज फिल्म्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टची अधिकृत घोषणा केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभय पन्नू (Abhay Pannu) करणार असून, आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांच्या मार्गदर्शनाखाली या चित्रपटाची संकल्पना विकसित करण्यात आली आहे. तर यशराज फिल्म्सचे निर्माते अक्षय विधानी (Akshaye Widhani) या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. यशराज फिल्म्ससारख्या मोठ्या निर्मिती संस्थेचा हॉररपटांच्या विश्वातील हा पहिलाच प्रयत्न असल्याने या चित्रपटाबद्दल आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. वरुण धवनने आतापर्यंत रोमँटिक, विनोदी आणि अॅक्शनप्रधान अशा विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, हॉररपटाच्या माध्यमातून तो पहिल्यांदाच प्रेक्षकांना एका वेगळ्या अवतारात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या भूमिकेतून वरुण धवन प्रेक्षकांना कितपत धक्का देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दिग्दर्शक अभय पन्नू यांच्यासाठीही हा प्रोजेक्ट विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. यशराज फिल्म्सच्या भव्य निर्मिती मूल्यांसह भयपटाच्या वेगळ्या शैलीत ते कोणता प्रयोग करणार, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे. सध्या चित्रपटाच्या कथानकाबाबत, इतर कलाकारांबाबत किंवा तांत्रिक बाबींबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, हा चित्रपट 31 मार्च 2028 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मंत्रीपदासाठी हपापलेले दोन–चार लोक; विलीनीकरणावर संजय राऊतांचा इशारा-
यशराज फिल्म्सचा पहिलाच हॉररपट, वरुण धवनची प्रमुख भूमिका आणि आदित्य चोप्रांचे मार्गदर्शन या तिन्ही गोष्टींमुळे या आगामी चित्रपटाने घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. आता या भयपटातून यशराज फिल्म्स प्रेक्षकांना किती थरारक अनुभव देणार, याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.