मनसेच्या नितीन भुतारेंवर कारवाई; ओबीसीकडून निषेध, कारवाई सहन करणार नाही

मनसेच्या नितीन भुतारेंवर कारवाई; ओबीसीकडून निषेध, कारवाई सहन करणार नाही

Ahmednagar : भाजप (BJP)उमेदवाराविरोधात मनसेच्या (MNS)पदाधिकाऱ्याने वक्तव्य केल्याने त्यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. मनसेचे नगरमधील नेते नितीन भुतारे (Nitin Bhutare)यांना जिल्हा सचिव पदावरुन हटवण्यात आले आहे. भाजप उमेदवार खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांच्याविरोधात वक्तव्य केल्याने त्यांच्यावर मनसेकडून ही कारवाई करण्यात आली. भुतारे यांच्यावर पक्षाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे सकल ओबीसी समाजाच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

Loksabha Election : भाजपच्या स्टार प्रचारकांची घोषणा; महाराष्ट्रातले कोण?

मनसे नेते नितीन भुतारे यांनी लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात भूमिका मांडल्यामुळे तसेच सर्वसामान्य जनतेच्या बाजूने भूमिका घेतली.

Loksabha Election : भाजपच्या स्टार प्रचारकांची घोषणा; महाराष्ट्रातले कोण?
त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्यावर कुठलीही चूक नसताना कारवाई केली, हा अन्याय ओबीसी समाज सहन करणार नाही, सर्व ओबीसी समाज युवा नेते नितीन भुतारे यांच्या पाठीमागे उभा आहे. सत्य आणि परखड भूमिका घेणे हे नितीन भुतारे यांचे काम आहे. ते सातत्याने करत आले, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणी केला तर सकल ओबीसी समाज सहन करणार नसल्याचे भरत गारुडकर यांनी सांगितले.

यावेळी बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, परेश लोखंडे राजेंद्र पडोळे, सुरेश चिपाडे, रमेश सानप, सागर फुलसौंदर, मंगेश खंगले, बाबा पटवेकर आदी उपस्थित होते.

नेमकं प्रकरण काय?
कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाने थेट खासदार सुजय विखेंशी दूरध्वनीवर संपर्क केल्याचे दाखवून द्या आणि एक हजार रुपये बक्षीस घेऊन जा. खासदार विखे हे सर्वसामान्य नागरिकांना भेटत नाहीत. त्यांच्या भेटीसाठी खूप प्रयत्न करावे लागतात.

स्वीय सहायकांचे अडथळे खूप येतात. तरीदेखील संपर्क होईल की नाही, हे सांगता येत नाही, अशी टीका नितीन भुतारे यांनी केली होती. त्यानंतर मनसेकडून नितीन भुतारे यांच्यावर कारवाई करत त्यांना पदावरुन हटवण्यात आले. या निर्णयाविरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या कारवाईविरोधात सकल ओबीसी समाज नेमकी काय भूमिका घेणार हे देखील पाहावं लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज