लेट्सअप विश्लेषण : जरांगे-आंबेडकर ‘मविआ’ चा गेम करणार; 2019 च्या ‘वंचित’ फॅक्टरनं टेन्शन
मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांपूर्वी जरांगे आणि आंबेडकरांच्या नव्या आघाडीमुळे महाविकास आघाडीचा गेम होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली असून, नेमकं मतांचं गणित कसं निर्णायक ठरू शकतं हेच जाणून घेऊयात…
Letsupp Special : साताऱ्यात उलथापालथ; उदयनराजे भाजपचे उमेदवार ठरताच, पृथ्वीराज चव्हाण रिंगणात उतरणार
गेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीला 12 ते 15 मतदारसंघांमध्ये वंचितचा फटका बसला होता. तर, त्याचा थेट फायदा भाजप-शिवसेना युतीला झाला होता. आताही तशीच स्थिती तयार होत असून, प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे हे एकत्र आल्यास मविआला मोठा फटका बसेल. तर, महायुतीलाही काही जांगावर फटक्याचा सामना करावा लागू शकतो. कारण वंचितसोबत जरांगे असल्याने मतांमध्ये मराठा व्होट बँकेमुळे ताकद वाढण्यास मदत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे असे 15 उमेदवार आहेत ज्यांना साधारण 90 हजार ते 3 लाखांपर्यंत मते मिळाली होती. या सर्व ठिकाणी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या पराभवात या मतांचा मोठा वाटा राहिला होता. त्यामुळे याहीवेळी वंचित फॅक्टर चालल्यास त्याचा फटका मविआला बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जरांगेंसोबतची आघाडी नव्या राजकारणाची नांदी
दरम्यान, जरांगे पाटलांसोबतच्या आघाडीबाबत 30 मार्च पर्यंत वाट बघण्याची विनंती मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यावर बोलताना आंबेडकर म्हणाले की, जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांसोबत जी आघाडी होतेय ती सामाजिक आघाडी आहे. कारण त्यांनी कोणताही पक्ष स्थापन केलेला नाही. त्याला आम्ही राजकीय आयाम देऊ इच्छित आहोत. लोक ही आघाडी स्विकारतील असेही आंबेडकरांनी सांगितले. यातून नीतिमत्ता, मूल्य आणि सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भातील नवे राजकारण सुरू होईल असा विश्वासही आंबेडकांरांनी व्यक्त केला आहे.
Letsupp Special : नाही मशाल, फक्त विशाल : उद्धव ठाकरेंसाठी सांगली भूंकपाचे केंद्र
2019 प्रमाणे वंचित फॅक्टर चालल्यास मविआला फटका
गेल्या म्हणजेच 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघडीने महत्त्वाची भूमिका निभावली होती. याचा सर्वाधिक फटका हा त्यावेळच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहन करावा लागला होता. मात्र, यंदाचं चित्र वेगळं असून, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट अशी आघाडी आहे. त्यामुळे जर 2019 प्रमाणे मते वळवण्यासाठी वंचित फॅक्टर याहीवेळी चालला तर. त्याचा थेट परिणाम मविआला बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात असून, आंबेडकरांनी उमेदवारांची यादी जाहीर केल्याने मविआचे टेन्शन वाढले आहे.
2019 मध्ये काय होता निकाल
सांगली
विजयी – संजयकाका पाटील (भाजप) – 5 लाख 08 हजार 995
पराभूत – विशाल प्रकाशबापू पाटील (स्वाभिमानी + काँग्रेस) – 3 लाख 44 हजार 643
वंचितची मते – गोपीचंद पडळकर (वंबआ) – 3 लाख 00234
अकोला
विजयी – संजय शामराव धोत्रे (भाजप) – 5 लाख 54 हजार 444
पराभूत – हिदायतुल्लाह बराकातुल्लाह पटेल – 2 लाख 54 हजार 370
वंचितची मते – प्रकाश आंबेडकर – 2 लाख 78 हजार 848 मते
भाई बी. सी. कांबळे (बसप) – 7 हजार 780
ठाकरेंसमोर काँग्रेस नतमस्तक, घरचा आहेर देत निरूपम यांनी दिले ‘जय महाराष्ट्र’ करण्याचे संकेत
हिंगोली
विजयी – हेमंत पाटील (शिवसेना) – 5 लाख 86 हजार 312
पराभूत – सुभाषराव बापूराव वानखेडे (काँग्रेस) – 3 लाख 8 हजार 456
वंचितची मते – मोहन राठोड (वंबआ) – 1 लाख 74 हजार 51
संदेश रामचंद्र चव्हाण (अपक्ष) – 23 हजार 690
डॉ. दत्ता मारोती धानवे (बसप) – 5 हजार 550
बुलढाणा
विजयी – प्रतापराव गणपतराव जाधव (शिवसेना) – 5 लाख 21 हजार 977
पराभूत – डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगे (काँग्रेस) – 3 लाख 88 हजार 690
वंचितची मते – बळीराम सिरस्कार (वंबआ) – 1 लाख 72 हजार 627
अब्दुल हाफिज अब्दुल अजिज (बसप) – 6 हजार 565
मोठी बातमी : आंबेडकरांनी मोठा डाव टाकला; ‘मविआ’ शी काडीमोड, लोकसभा स्वतंत्र लढवण्याची घोषणा
सोलापूर
विजयी – डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य (भाजप) – 5 लाख 24 हजार 985
पराभूत – सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) – 3 लाख 66 हजार 377
वंचितची मते – बाळासाहेब आंबेडकर (वंबआ) – 1 लाख 70 हजार 7
नांदेड
विजयी – प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजप) – 4 लाख 86 हजार 806
पराभूत – अशोक शंकरराव चव्हाण (काँग्रेस) – 4 लाख 46 हजार 658
वंचितची मते – यशपाल भिंगे (वंबआ) – 1 लाख 66 हजार 196
नोटा (NOTA) – 6 लाख 114
अब्दुल रईस अहमद (आंबेडकर नॅशनल काँग्रेस) – 4 लाख 147
परभणी
विजयी – संजय हरिभाऊ जाधव (भाजप)– 5 लाख 38 हजार 941
पराभूत – राजेश उत्तमराव विटेकर (काँग्रेस) – 4 लाख 96 हजार 742
वंचितची मते – आलमगीर खान (वंबआ) – 1 लाख 49 हजार 946
कॉ. राजन क्षीरसागर (CPI) – 17 हजार 095
हातकणंगले
विजयी – धैर्यशील संभाजीराव माने (शिवसेना) – 5 लाख 85 हजार 776
पराभूत – राजू शेट्टी (स्वाभिमानी+काँग्रेस) – 4 लाख 89 हजार 737
वंचितची मते – अस्लाम सय्यद (वंबआ) – 1 लाख 23 हजार 419
जानकरांची एन्ट्री… विटेकरांचा बळी देऊन अजितदादांनी बारामती सेफ केली?
लातूर
विजयी – सुधाकर तुकाराम श्रृंगारे (भाजप) – 6 लाख 61 हजार 495
पराभूत – मच्छिंद्र गुणवंतराव कामत (काँग्रेस) – 3 लाख 72 हजार 384
वंचितची मते – राम गरकर (वंबआ) – 1 लाख 12 हजार 255
गडचिरोली-चिमूर
विजयी – अशोक महादेवराव नेते (भाजप) – 5 लाख 19 हजार 968
पराभूत – डॉ. नामदेव दल्लुजी उसेंडी (काँग्रेस) – 4 लाख 42 हजार 442
वंचितची मते – रमेश गजबे (वंबआ) – 1 लाख 11 हजार 468
हरिचंद्र नागोजी मंगम (बसप) – 28 हजार 104
नोटा (NOTA) – 24 हजार 599
नाशिक
विजयी – हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना) – 5 लाख 63 हजार 599
पराभूत – समीर भुजबळ (राष्ट्रवादी) – 2 लाख 71 हजार 395
वंचितची मते – पवन पवार (वंबआ) – 1 लाख 9 हजार 981
ठाकरेंचा अहंकार अन् मुंबईला POK म्हणणाऱ्या कंगनाला भाजपनं यासाठी दिली उमेदवारी!
धाराशिव
विजयी -ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर (शिवसेना) – 5 लाख 96 हजार 640
पराभूत – राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील (काँग्रेस) – 4 लाख 69 हजार 74
वंचितची मते – अर्जुनदादा सलगर (वंबआ) – 98 हजार 579
नोटा (NOTA) – 10 हजार 24
यवतमाळ-वाशीम
विजयी – भावना पुंडलिकराव गवली (शिवसेना) – 5 लाख 42 हजार 98
पराभूत – माणिकराव ठाकरे (काँग्रेस) – 4 लाख 24 हजार 159
वंचितची मते – प्रविण पवार (वंबआ) – 94 हजार 228
वैशाली सुधाकर येडे (प्रहार जनशक्ती पक्ष) – 20 हजार 620
राज ठाकरे यांच्यामार्फत शिंदेंना संपविण्याचा डाव, कोणी आखलाय?
बीड
विजयी – प्रितम गोपीनाथ मुंडे (भाजप) – 6 लाख 78 हजार 175
पराभूत – बजरंग मनोहर सोनवणे (राष्ट्रवादी) – 5 लाख 9 हजार 807
वंचितची मते – विष्णू जाधव (वंबआ) – 92 हजार 139
रावेर
विजयी – रक्षा निखिल खडसे (भाजप) – 6 लाख 55 हजार 386
पराभूत – डॉ. उल्हास वासुदेव पाटील (काँग्रस) – 3 लाख 19 हजार 504
वंचितची मते – नितीन कांडेलकर (वंबआ) – 88 हजार 365
नोटा (NOTA) – 9 हजार 216
छ.संभाजीनगर
विजयी – इम्तियाज जलिल (वंबआ) – 3 लाख 89 हजार 42,
पराभूत : चंद्रकांत खैरे (शिवसेना) – 3 लाख 84 हजार 550
पराभूत :सुभाष झांबड (काँग्रेस) – 91 हजार 789