मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा शाहू महाराज यांना पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांची घोषणा
Prakash Ambedkar: वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati)यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसने शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीने (MVA) शाहू महाराज छत्रपती यांना मैदानात उतरवले आहे. त्या जागेसाठी आपण जाहीर पाठिंबा देत असल्याचे आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. यापूर्वीदेखील वंचितकडून कॉंग्रेसला काही जागांवर पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.
कॉंग्रेस पक्षाने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली आहे. शाहू महाराज यांना जिंकून आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Amruta Khanvilkar: चंद्रमुखीचं मनमोहक रूप; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
महाविकास आघाडीचे जागावाटपावर अद्यापही एकमत झालेले नाही, असेही ते म्हणाले. 26 तारखेपर्यंत आम्ही महाविकास आघाडीसोबत असणार की नाही हे आम्ही जाहीर करणार असल्याचेही यावेळी वंचित बहुजन आघाडीने यावेळी स्पष्ट केले आहे.
देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत, मात्र राज्यात महाविकास आघाडीसह महायुतीच्या काही जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला दिसत नाही. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यासंदर्भात अनेक बैठकाही झाल्या. मात्र, यावर अद्यापही तोडगा निघाला नाही.
महाविकास आघाडीमध्ये अद्यापही लोकसभेच्या जागावाटपांबद्दल काही गोष्टींमध्ये वाद असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच आता महाविकास आघाडीने कोल्हापूर मतदारसंघातून जाहीर केलेले उमेदवार शाहू महाराजांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीची बांधणी केली आहे. त्यामुळे आम्ही कोणताही निर्णय घेतला तरी त्याची आम्ही अंमलबजावणी करु शकतो, असेही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. महाविकास आघाडीतली भांडणं जर संपत नसतील तर मग आम्ही 26 तारखेला आमचा निर्णय जाहीर करु असेही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.