MVA Vs Shinde Group : महाराष्ट्राच्या राजकारणात संभाजीनगरचे महत्त्व वाढले!
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आता छत्रपती संभाजीनगरचे महत्त्व वाढताना दिसत आहे. येत्या २ एप्रिलला महाविकास आघाडीची म्हणजे उद्धव ठाकरे यांची सभा येथे होत आहे. त्यानंतर लगेचच पुढच्या आठवड्यात भाजप आणि शिंदे गटाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे वाढत्या उन्हाबरोबर राज्यातील राजकीय वातावरण देखील तापणारअसल्याचे चित्र आहे.
राज्यात महाविकास आघाडीच्या विभागवार सभा होणार आहे. त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची येत्या २ एप्रिल रोजी होणाऱ्या जाहीर सभेने होणार आहे. या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे संबोधणार आहे. तर त्यानंतर पुढच्या आठवड्यात शिंदे गटाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साधारणपणे ८ किंवा ९ एप्रिल रोजी सभा घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे गट असा थेट सामनाच राज्यात पाहायला मिळणार आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्या विरोधात पुणे महिला काँग्रेसचे मूक आंदोलन – Letsupp
शिवसेनेत फाटाफूट झाल्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मात्र, त्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह हे दोन्हीही एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे तर राज्यातील वातावरण आणखीनच बिघडले आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गटात रोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यापुढील काळात जसजस्या निवडणुका जवळ येतील तसतस्या जाहीर सभांमधून आरोप-प्रत्यारोप देखील वाढणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या सभेची महाविकास आघाडीकडून आतापासूनच तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात राजकीय धुरळा उडणार आहे.