सांगली आम्हीच लढणार! विशाल पाटलांनी ठाकरे अन् राऊतांना ठणकावलं; मुहूर्तावर घोषणा होणार?

सांगली आम्हीच लढणार! विशाल पाटलांनी ठाकरे अन् राऊतांना ठणकावलं; मुहूर्तावर घोषणा होणार?

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून लढण्याबाबत आम्ही ठाम आहोत. याबाबत कदाचित गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा होऊ शकते. एवढे दिवस थांबला आहात. उद्यापर्यंत वाट बघा. पण सांगलीमधून काँग्रेसच (Congress) लढणार असे म्हणत इच्छुक उमेदवार आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ठणकावले.

सांगलीतील काँग्रेस नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद आज (आठ एप्रिल) पार पडली. यावेळी विशाल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील उपस्थित होते. (Vishal Patil warn Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party chief and MP Sanjay Raut saying that only Congress will contest from Sangli)

या पत्रकार परिषदेत बोलताना विशाल पाटील म्हणाले, सांगली काँग्रेसमध्ये विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचे असा सर्वांनी निर्णय घेतला होता. शिवाय माझ्यारुपाने एकच उमेदवार द्यायचा असेही ठरले होते. सर्वांच्या मताचा विचार करुन माझे एकट्याचेच नाव दिल्लीला पाठवण्यात आले. पण अनपेक्षितपणे जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला. तरीही आम्ही यावरुन वाद घालण्यापेक्षा आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

अवकाळी पावसाचं संकट कायम! विदर्भ, मराठवाड्यात पावसाची इशारा, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

पण मागच्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये सांगलीबद्दल मोठी चर्चा झाली. खासदार संजय राऊत यांचा नुकताच दौरा पार पडला. त्यांच्याबद्दल आमच्या सर्वांच्या मनात आदराची भावना आहे. पण विश्वजीत कदम यांच्याबद्दल संशय निर्माण करणे योग्य नाही. त्यांच्याविरोधात बोलणे आघाडी धर्माला शोभणारे नाही. कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याच्या वल्गना करणे चुकीचे आहे.  सांगलीचा विषय बंद खोलीत व्हायला हवा होता. तो बाहेर आला म्हणून विश्वजीत कदम यांनी याला उत्तर दिले.

संजय राऊत यांचा आवाज पुरोगामी चळवळीचा आहे. मात्र त्यांचा हा आवाज सांगलीच्या विरोधात जात आहे. त्यांची मागणी महाराष्ट्रभर आहे, देशभर आहे. मग त्यांनी दोन-तीन दिवस इथे का वाया घालवले? पण त्यांना सांगलीच्या मतदारांचा अंदाज आला असेलच. त्यामुळे त्यांचे मनपरिवर्तन झाले असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो, असाही खोचक टोला विशाल पाटील यांनी लगावला.

स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या त्यांचे डिपॉझिट जप्त होणार…विखेंचे लंकेंना चॅलेंज

उद्या या विषयाचा निकाल लागेल :

सांगलीची जागा कोणाची याबाबत उद्या निकाल लागेल. उद्या चांगला निर्णय होईल. आपल्याला गुढी उभारायची आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उमेदवारी जाहीर होईल. तिकिट मागायला आम्ही कुठेही जाणार नाही. याची संपूर्ण जबाबदारी विश्वजीत कदम यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली आहे. ते अपयशी ठरणार नाहीत, असा विश्वास देखील यावेळी विशाल पाटील यांनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube