अवकाळी पावसाचं संकट कायम! विदर्भ, मराठवाड्यात पावसाची इशारा, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

अवकाळी पावसाचं संकट कायम! विदर्भ, मराठवाड्यात पावसाची इशारा, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. शहरांच्या कमाल तापमानात घट होत असतानाच, काही ठिकाणी अवकाळी पावसाचं (Unseasonal rain) सकट कायम आहे. 8 ते 10 एप्रिल या काळात राज्यात काही ठिकाणी हलका ते वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातही काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

Madhuri Pawar : ‘रानबाजार’ फेम माधुरी पवारचा ब्लॅक साडीतील लूक 

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गर्मी वाढणार आहे. तर कोकण गोव्यात वातावरण उष्ण आणि दमट असेल. विदर्भात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. तर काही ठिकाणी तापमानात वाढ होऊन पारा ४० अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे. आज विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे (ताशी 40-50 किमी वेगाने) वाहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट होणार असल्याने यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Horoscope Today: ‘कुंभ’ राशीच्या व्यक्तींना आज नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात! 

IMD सांगितले की, राज्यात बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येत आहेत. या वाऱ्याचा परिणाम म्हणून सोमवारी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी किनारपट्टी वगळता राज्यातील बहुतांश भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.

आयएमडीने राज्यातील काही भागात यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने आज जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत आकाश निरभ्र राहणार
दरम्यान, हवेतील आर्द्रता वाढल्याने मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये उकाडा वाढणार आहे. येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरांसाठी हवामान अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात आकाश बहुतांशी निरभ्र राहील. तर काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान हे 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतकं असेल.

उन्हाचा चटका कमी होणार
रविवारी (ता. 7) सकाळपर्यंतच्या 24 तासांत सोलापूर आणि चंद्रपूरमध्ये राज्यातील सर्वाधिक 42.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. 8) राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube