स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या त्यांचे डिपॉझिट जप्त होणार…विखेंचे लंकेंना चॅलेंज

स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या त्यांचे डिपॉझिट जप्त होणार…विखेंचे लंकेंना चॅलेंज

Sujay Vikhe On Nilesh Lanke : महायुतीचे नगर दक्षिणेचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikhe) यांना जीवे मारण्याची धमकीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यावर बोलताना विखे यांनी आपले प्रतिस्पर्धी असलेले निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मी निवडणूक लढवली नसती तर पुढील 25 वर्षे जिल्ह्यातील नागरिक हे दहशतीत राहिले असते. पारनेर मधील जनता यापुढे कोणाच्याही दहशतीत राहणार नाही. तुम्ही आजच स्टॅम्प पेपरवर (stamp paper) लिहून घ्या चार जूनला अहिल्यानगरच्या तुतारी चिन्ह असलेल्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशा शब्दात सुजय विखे यांनी थेट निलेश लंके यांना चॅलेंज केले आहे.

कामोठे येथे महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे यांची मोठी सभा पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक सभेला जमा झाले होते. दरम्यान रविवारी सुजय विखे यांना गोळ्या घालून ठार मारू अशा आशयाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या प्रकरणावरून विखे यांनी आपले प्रतिस्पर्धी असलेले निलेश लंके यांचा नामोउल्लेख टाळत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच पारनेर कर ज्या दहशतीत जगत आहे त्यांची सुटका विखे कुटुंबीय करेल अशी गवाही देखील यावेळी विखे यांनी दिली.

आपल्या भाषणात बोलताना विखे म्हणाले, आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे. आपल्याला गुंडगिरी नाही जमत. मी निवडणूक लढवली नसती तर पुढील 25 वर्षे जिल्ह्यातील नागरिक हे दहशतीत राहिले असते. पारनेर मधील जनता यापुढे कोणाच्याही दहशतीत राहणार नाही. गेली साडेचार वर्षे पारनेर कर ज्या दहशतीतमध्ये राहिले मात्र आता त्यांना ती सहन करावी लागणार नाही, कारण विखे कुटुंबीय तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहील असा विश्वास सुजय विखे यांनी व्यक्त केला.

तसेच पुढे बोलताना विखे म्हणाले, आजही तुमची स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या चार जूनला अहिल्यानगरच्या तुतारी चिन्ह असलेल्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशा शब्दात विखे यांनी थेट लंके यांना चॅलेंज केले आहे. ज्यांनी आजवर विखे कुटुंबियांना साथ दिली अशा व्यक्तींची साथ आम्ही कधीही सोडली नाही आहे. आम्ही त्यांना सोबत घेऊन चालतो अशा शब्दात सुजय विखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

विरोधकांवर ताशरे ओढताना विजय औटी यांनी सुपा एमआयडीसीमध्ये स्थानिकांना डावलून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम पारनेर मधील लोकप्रतिनिधी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या दहशतीला डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरंग लागणार असून, त्यांच्या व्हिजनमुळे येणाऱ्या काळात स्थलांतरणाला आळा बसणार आहे. यामुळे स्थानिक तरुणांना आपल्या परिसरात काम मिळेल, मागील पाच वर्षांच्या त्यांच्या विकास कामामुळे जनतेचा नेता म्हणून डॉ. सुजय विखे पाटील लोकांच्या पसंतीला उतरत आहेत असे औटी यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube