उमेदवारी जाहीर होताच निलेश लंकेंकडून विखेंचं नाव न घेता जहरी टीका

उमेदवारी जाहीर होताच निलेश लंकेंकडून विखेंचं नाव न घेता जहरी टीका

Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)यांना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar)आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांचे आभार मानले. त्याचवेळी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही असा विश्वासही यावेळी निलेश लंके यांनी व्यक्त केला. त्याचवेळी आपल्या प्रतिष्ठेसाठी आणि अस्तित्वासाठी काहीजण निवडणूक लढवत असल्याचा गंभीर आरोप यावेळी नाव न घेता खासदार सुजय विखे यांच्यावर केला.

मोठी बातमी : ‘तुतारी’ हाती घेताच निलेश लंकेंना नगरमधून उमेदवारी; पवार गटाची पहिली यादी जाहीर

निलेश लंके यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर होताच त्यांनी विखेंवर नाव न घेता घणाघाती टीका केली. यावेळी निलेश लंके म्हणाले की, काहीजण आपल्या अस्तित्वासाठी, प्रतिष्ठेसाठी निवडणूक लढवतात, पण आपण आपला शेतकरी सुखी समाधानी झाला पाहिजे, या मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते कसे सुटतील यासाठी प्रयत्न करणार आहे.

Loksabha Election 2024 : बारामतीचा उमेदवार जाहीर का होत नाही? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पाण्याचे प्रश्न मोठा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. त्याचबरोबर बरोजगारीचा प्रश्नही मोठा आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. कांद्याला भाव नाही, दूध दर हे सगळे मुद्दे घेऊन आपण लोकसभेमध्ये जाणार असल्याचे यावेळी निलेश लंके यांनी सांगितले.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील जनता आपल्याला या भागाचे नेतृत्व करण्याची संधी तर देणार असल्याचा विश्वास यावेळी निलेश लंके यांनी व्यक्त केला. कोण काय म्हणाले? यापेक्षा निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर काय करणार आहोत हे सांगणे अधिक गरजेचे असल्याचे यावेळी निलेश लंके म्हणाले.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील काही आमदार हे अजितदादांसोबत आहेत आणि काही आमदार शरद पवार गटासोबत आहेत. त्यावर आमदार निलेश लंके म्हणाले की, पाहू आता त्यावर कसा मार्ग निघतोय. पण आता तर लढाई सुरु झाली आहे. आता आज उमेदवारी जाहीर झाली आहे. आता एकेक चित्र स्पष्ट होईल, असेही यावेळी निलेश लंके म्हणाले.

त्याचबरोबर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांवरही निलेश लंके यांनी आपला विश्वास व्यक्त केला आहे. सर्व नेते मंडळी महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षही एकदिलाने, एकजिवाने आपल्याच पक्षाचा उमेदवार असल्याच्या भावनेने ते काम करणार असल्याचा विश्वासही यावेळी निलेश लंके यांनी व्यक्त केला. त्याचवेळी आपण कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेणार असल्याचे यावेळी निलेश लंके यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज