Loksabha Election 2024 : राज्यात युती की आघाडी कोण ठरणार भारी? ओपिनियन पोलने भाजपची धाकधूक वाढली
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. त्यामध्ये राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कोण भारी ठरणार? यावर देशात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यास काही तास शिल्लक असताना ओपिनियन पोलचा ( Opinion Poll ) निकाल समोर आला आहे. यामुळे भाजपची धाकधूक वाढल्याचं बोलंल जात आहे.
पुणे महानगरपालिका आयुक्तपदी राजेंद्र भोसले, विक्रम कुमार यांच्यावर एमएमआरडीची जबाबदारी
निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा करण्यापूर्वी एबीपी सी वोटर यांचा लोकसभा निवडणुकांबाबतचा ओपिनियन पोल जाहीर केला आहे. या पोलमध्ये राज्यातील जनतेच्या आगामी निवडणुकांबाबतचा कल समोर आला आहे. काय आहे हा पोल? युती आणि आघाडीमधील कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याचा या पोलमध्ये काय अंदाज बांधण्यात आला आहे पाहूयात…
Pune : टायरमध्ये घालण्याचा इशारा देणाऱ्या अजित पवारांकडून मोक्काच्या आरोपीची सुटका
या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभेच्या जागांपैकी 28 जागांवर महायुती तर 20 जागांवर महाविकास आघाडीचा विजय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे 45 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार असलेल्या भाजपला या पोलमध्ये मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे. तसेच युती आणि आघाडी मधील पक्षनिहाय आकडेवारी बद्दल सांगायचं झालं. तर या पोलमध्ये भाजपला 22 जागांवर विजय मिळू शकतो. तर शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या मिळून सहा जागा निवडून येऊ शकतात. तर महायुतीमधील काँग्रेसचे चार खासदार विजय होतील तर ठाकरे गट आणि शरद पवार यांची मिळून 16 खासदार विजयी होतील असा निकाल या पोलमधून समोर आला आहे.
या आकडेवारी बद्दल सांगायचं झालं तर 2019 ला भाजपला 23 जागांवर विजय मिळाला होता. यावेळी भाजपची एक जागा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे 2019 ला राज्यात केवळ एकच खासदार असणाऱ्या काँग्रेसला चार जागांवर विजय मिळू शकतो. त्यामुळे त्यांच्या खासदारांच्या संख्येत वाढ झाल्याचं त्यामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हा ओपिनियन पोल म्हणजे सुरुवातीला शिंदे गट आणि त्यानंतर अजित पवार गट यांना सोबत घेऊनही भाजपची एक जागा कमी होणार आहे. तसेच त्यांचा 45 हून अधिक जागा मिळवण्याचा निर्धारही निष्फळ ठरण्याची चिन्हे असल्याने हा भाजपासाठी धक्का मानला जात आहे.