टिपू सुलतान मुद्द्यावरून अहिल्यानगर मध्ये वातावरण तापलं… पुतळ्याचे दहन तर कुठे दुग्धभिषेक

आता मुस्लिम समाज हा देखील आक्रमक झाला असून टिपू सुलतान यांच्या प्रतिकात्मक फोटोला दुग्ध विषयक करत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

  • Written By: Published:
Untitled Design 60

Ahilyanagar heated up over the Tipu Sultan issue : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यभर आता त्याचे पडसाद उमटत आहे अहिल्यानगर मध्ये देखील हिंदुत्ववादी संघटनांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत टिपू सुलतान यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले तर यावरून आता मुस्लिम समाज हा देखील आक्रमक झाला असून टिपू सुलतान यांच्या प्रतिकात्मक फोटोला दुग्ध विषयक करत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली यामुळे टिपू सुलतान यांच्या मुद्द्यावरून अहिल्यानगर मध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता तयार झाली आहे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना टिपू सुलतान यांची तुलना थेट छत्रपती शिवरायांशी केली होती यावरून या वादाला तोंड फुटले त्यानंतर राज्यभर सपकाळ यांच्या वक्तव्या वरून हिंदुत्ववादी संघटना तसेच लोकप्रतिनिधी हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सत्ताधाऱ्यांनी सपकाळ यांच्यावरती जोरदार निशाणा देखील साधला तसेच राज्यभर अनेक ठिकाणी सपकाळ यांच्या विरोधात निदर्शने निषेध मोर्चा तसेच त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

मंगळवारी सकाळी अहिल्यानगर शहरांमध्ये देखील हिंदुत्ववादी संघटनांकडून हर्षवर्धन सपकाळ व टिपू सुलतान यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले तर या घटनेला एक दिवसही उलटत नाही तोच मंगळवारी रात्री अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या जवळच परिसरात टिपू सुलतान यांच्या फोटोला काही तरुणांकडून दुग्ध विषयक करण्यात आला व त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देखील देण्यात आल्या.

अपघात की कटकारस्थान?; परदेशी पायलटवर प्रश्न; व्हीएसआरच्या कामकाजावर रोहित पवारांचा इशारा

टिपू सुलतान यांचे तुलना शिवरायांशी केल्याने आता या वादाला नवे तोंड फुटले असून अहिल्यानगर शहरांमध्ये आता धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे टिपू सुलतान यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतल्याचे देखील समजते आहे तसेच अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे देखील या प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झाले.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून धार्मिक घटनांवरून अहिल्यानगर शहर हे वादाचे केंद्रबिंदू बनू लागले आहे यातच आता तू सुलतान यांच्या मुद्द्यावरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्थेला तडा जाऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जात आहे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे

follow us