Exit Poll 2023 Rajsthan : भाजपला दिलासा अन् टेन्शनही; Exit Poll चा अंदाज काय?

Exit Poll 2023 Rajsthan : भाजपला दिलासा अन् टेन्शनही; Exit Poll चा अंदाज काय?

Exit Poll 2023 Rajsthan : देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाची तारीख आता जवळ आली आहे. निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलची(Exit Poll 2023 Rajsthan) आकडेवारी समोर आली आहे. राजस्थानातून एक्झिट पोलमधून समोर आलेल्या आकडेवारीमुळे भाजपला काहीसा दिलासा मिळाला असून काही प्रमाणात टेन्शनही आहे. कारण एक्झिट पोलच्या आकडेवारीनूसार काँग्रेस भाजपला समसमान जागा मिळणार असल्याचं दिसत आहे.

आज-तकच्या एस्किसच्या आकडेवारीनूसार राजस्थानात भाजपला 80-100 जागांवर विजय मिळणार असून काँग्रेसला 86-106 जागा मिळणार आहेत. तसेच 9-18 जागा इतर अपक्ष उमेदवारांना मिळणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे राजस्थानात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई होणार असल्याचं दिसून येत आहे.

President Droupadi Murmu Visited Shani Shingnapur : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलं चौथऱ्यावरुन शनिदर्शन…

सीवोटरच्या निष्कर्षानूसार भाजपला राजस्थानात सर्वाधिक जागा मिळणार असल्याची शक्यता आहे. भाजपला 94-114 जागांवर विजय निश्चित असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. तर काँग्रेसला 71-91 जागा मिळणार असल्याचं दिसतंय. तर इतर अपक्ष उमेदवारांच्या कोट्यात 9-19 जागा मिळणार आहेत. त्यामुळे सीवोटरच्या निष्कर्षानूसार भाजपच राजस्थाना झेंडा फडकवणार असल्याचं दिसतंय.

Polstrat
काँग्रेस – 90-100
भाजप – 100-110
इतर – 5-15

दक्षिण आशियात प्रथमच नोंदणीकृत समलैंगिक विवाह, असं करणारा ‘हा’ पहिला देश ठरला

Exsis My India
काँग्रेस – 86-106
भाजप – 80-100
इतर – 9-18

दरम्यान, राजस्थानात काँग्रेसमध्ये निवडणुकीआधी संघर्ष झाल्याचं पाहायला मिळाला होता. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे भाजपकडून माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहिलं जात होतं. मात्र, वसुंधराराजे यांची भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती.

Uttarakhand Tunnel : देवदुतांकडून मजुरांचा कोंडलेला श्वास मोकळा; प्रत्येकी 50 हजारांचं बक्षीस

भाजपला राजस्थानात स्पष्ट बहुमत मिळाल्यास पक्षाकडून वसुंधरा राजेंऐवजी दुसऱ्या एखाद्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्यास आणि पक्षावर अपक्ष आमदारांची जुळवाजुळव करण्याची वेळ आल्यास वसुंधरा राजे पुन्हा एकदा गेमचेंजर ठरू शकतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube