President Droupadi Murmu Visited Shani Shingnapur : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलं चौथऱ्यावरुन शनिदर्शन…

President Droupadi Murmu Visited Shani Shingnapur : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलं चौथऱ्यावरुन शनिदर्शन…

President Droupadi Murmu Visited Shani Shingnapur: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu)यांनी शनिशिंगणापूर (Shanishinganapur)येथे शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले. चौथऱ्यावर जाऊन शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला. त्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद देखील घेतला.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस(Governor Ramesh Bais), जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील(Radhakrishna Vikhe-Patil), सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

Kevin Pietersen : …अन् मी पैज हरलो! भारत वर्ल्डकप जिंकण्यावर लावली होती पैज, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा खुलासा

राष्ट्रपतींचे श्री शनैश्वर मंदिरात आगमन झाल्यावर त्यांनी शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले व उदासी महाराज मठात त्यांनी अभिषेकही केला. अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला.

चिंता वाढली! उत्तराखंडमधील दोन मुलांमध्ये आढळली चीनमध्ये पसरलेल्या नव्या आजाराची लक्षणे

श्री शनिशिंगणापूर संस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. शनैश्वर मंदीर दर्शन झाल्यानंतर प्रसादालयात राष्ट्रपतींनी प्रसादाचे सेवनही केले.

शनिशिंगणापूरमध्ये दर्शन घेण्यासाठी महिलांना बंदी होती. त्यावर अनेक महिला संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. 2015 मध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला यश आलं. त्यानंतर शनि देवस्थानकडून चौथरा सर्वांसाठी खुला केला अन् सर्व वाद त्या ठिकाणीच मिटला.

आज शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तैलाभिषेक करुन दर्शन घेतल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, महिलांना चौथऱ्यावर प्रवेश नव्हता, तो आमच्या आंदोलनामुळे तसेच संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व महिलांना मिळाला. त्याच शनिदेवाच्या चौथऱ्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तैलाभिषेक केला, तेव्हा खूप छान वाटले. आमच्यासाठी हा अभिमानास्पद क्षण असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube