राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच विदर्भ दौऱ्यावर, नागपूरसह गडचिरोलीतील कार्यक्रमांना उपस्थित राहणार…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच विदर्भ दौऱ्यावर, नागपूरसह गडचिरोलीतील कार्यक्रमांना उपस्थित राहणार…

President Droupadi Murmu : राष्ट्रपती निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपती मुर्मू गडचिरोलीत होणाऱ्या गोडवाना विद्यापीठातील दीक्षांत समारंभात उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांचं सायंकाळच्या सुमारास नागपूरात आगमन होणार आहे. (President Draupadi Murmu’s first visit to Vidarbha, will attend events in Nagpur and Gadchiroli)

राष्ट्रपती मुर्मू यांच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पक्ष आणि चिन्ह आमच्यासोबत, जयंत पाटलांना नोटीसा काढण्याचा अधिकार नाही

राष्ट्रपतींचा हा पहिलाच विदर्भ दौरा असल्याने ते आज नागपुरात दाखल झाल्यानंतर गडचिरोलीकडे प्रयाण करणार आहेत. उद्या गोडावाना विद्यापीठाच्या दहाव्य दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार असून त्यानंतर ते
नागपुरातील कोराडीतील महालक्ष्मी देवीचे दर्शन आणि आरतीमध्ये सहभागी होणार आहेत.

याचदरम्यान, कोराडी मंदिर परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. एकीकडे राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आणि दुसरीकडे राष्ट्रपतींचा दौरा पाहता राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी नव्यानेच उपमुख्यमंत्री झालेले अजित पवारही उपस्थित राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube