पक्ष आणि चिन्ह आमच्यासोबत, जयंत पाटलांना नोटीसा काढण्याचा अधिकार नाही

पक्ष आणि चिन्ह आमच्यासोबत, जयंत पाटलांना नोटीसा काढण्याचा अधिकार नाही

Ajit Pawar on Jayant Patil : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आठ लोकांना नोटीस पाठवल्या आहेत. तसेच सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांना नोटीस काढण्याचा आणि कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे सांगितले.

अजित पवार म्हणाले की काल काही लोकांनी आम्हीच राष्ट्रावादी असल्याचे सांगितले. पण सुनिल तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आम्ही जे करतोय ते पक्षाच्या हिताचे करतो आहे. आमच्या नऊ लोकांना नोटीसा काढल्या आहेत. त्यांना नोटीसा काढण्याचा काही अधिकार नाही. पक्ष आणि चिन्ह आमच्यासोबत आहे असा आमचा ठाम विश्वास आहे. आमच्या सोबतच्या आमदारांचे भविष्य सुरक्षित राहावे. त्यांना घटनेची आणि कायद्याची अडचण येणार नाही. याबद्दलची खबरदारी आम्ही सर्वजण घेत आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.

जयंत पाटलांना नारळ; सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष : अजित पवारांचा गट अॅक्टिव्ह मोडवर

काल जितेंद्र आव्हाड यांना जयंत पाटील यांच्याकडून प्रतोद आणि विरोधी पक्षनेता नेमल्याचे जाहीर करण्यात आले होते. यावर अजित पवार म्हणाले की काल एकाला विरोधी पक्षनेता आणि प्रतोद नेमले आहे अशी बातमी वाचली. विरोधी पक्षनेता नेमण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांचे आहेत. विधानसभा सुरु असताना ज्या विरोधी पक्षाकडे संख्याबळ जास्त आहे अशा पक्षाचा विरोधी पक्षनेता नेमला जातो, असे अजित पवार यांनी सांगितले.

जयंत पाटलांचा थेट अजित पवारांना झटका; शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई

अजित पवार म्हणाले की आम्ही राष्ट्रवादीमध्ये आहेत. राष्ट्रवादी पक्षातल्या आमदारामध्ये संभ्रम, भिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्षातील बहुसंख्य आमदार आमच्यासोबत आहेत. आम्ही एकत्रपणे काम करतो आहेत. महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करत राहणार आणि देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही काम करणार आहेत. राज्याच्या विकास कामांसाठी केंद्राचा निधी लागतो, परवानगी लागते. केंद्र सरकार वेगळ्या विचाराचे आणि राज्य सरकार वेगळ्या विचाराचे असेल तर निधीच्या बाबतीत कमतरता भासते, असे अजित पवार यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube