Loksabha Election 2024 : सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंची उमेदवारी निश्चित? अमित शाहंच्या बैठकीनंतर निर्णय होणार

Loksabha Election 2024 : सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंची उमेदवारी निश्चित? अमित शाहंच्या बैठकीनंतर निर्णय होणार

Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (Loksabha Election 2024 ) लढवण्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. भाजपच्या महाराष्ट्रातील उमेदवारांच्या यादीमध्ये देखील त्यांना उमेदवारी न देण्यात आल्याने ते सध्या दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. या दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या 30 मिनिटांच्या बैठकीनंतर त्यांना उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेले नाही.

मुरलीधर मोहोळ यांनी गिरीश बापटांना छळले होते : पवारांना भेटताच धंगेकरांचा मोठा आरोप

दरम्यान दुसरीकडे राज्यामध्ये महायुतीच्या जागा वाटपाचं आणि भाजपच्या उर्वरित 28 जागां बाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात आल्या नाही. त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत थोडं थांबणं उचित होईल असं सातारा लोकसभेचे संयोजक सुनील काटकर यांनी म्हटलं होतं.त्याचबरोबर राष्ट्रवादीचे खासदार असताना अवघ्या सहा महिन्यात राजीनामा देऊन भाजपमध्ये आलेल्या उदयनराजे भोसले यांना सातारा भाजपच्या जिल्हा कार्यकारणीचा छुपा विरोध असल्याचे देखील बोलले जात होतं.

अजितदादांच्या खासदारावर शिंदे गटाचा अविश्वास; तटकरेंना विरोध अन् इशाराही एकसाथ

मात्र अशा कोणत्याही गोष्टी झाल्या नसल्याचं काटकर यांनी सांगितलं. तसेच उदयनराजेंची एकमताने सगळ्यांनी शिफारस केली असल्याचं यावेळी काटकर यांनी सांगितले. त्यामुळे आता दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपच्या आगामी उमेदवारांच्या यादीत उदयनराजे भोसले यांचे नाव येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

या अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांची त्यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे त्यांची भेट घेतली होती. मात्र या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा उमेदवारीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच त्यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज