अजितदादांच्या खासदारावर शिंदे गटाचा अविश्वास; तटकरेंना विरोध अन् इशाराही एकसाथ

अजितदादांच्या खासदारावर शिंदे गटाचा अविश्वास; तटकरेंना विरोध अन् इशाराही एकसाथ

Lok Sabha Election 2024 : राज्यातील महायुतीत सारंच काही व्यवस्थित सुरू आहे अशी परिस्थिती (Lok Sabha Election 2024) नाही. अनेक मतदारसंघात जागावाटपावरून धुसफूस वाढली आहे. कधी अजित पवार गट तर कधी शिंदे गट यांच्यात वादाच्या फैरी झडत आहेत. तर कधी हे दोन्ही भाजपवर संतप्त झाल्याचे दिसतात. जागावाटपाच्या मुद्द्यावरून हा वाद जरा जास्तच वाढत चालल्याचे दिसत आहे. अमरावती, रायगड, शिर्डी या काही मतदारसंघात अशी परिस्थिती दिसत आहे. आताही वादाची बातमी रायगड जिल्ह्यातून येत आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि शिंदे गटातील वाद विकोपाला गेला आहे. सुनील तटकरे यांच्या उमेदवारीला भाजपसह शिंदे गटाने जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे रायगडातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Lok sabha Election : सांगलीत विशाल पाटीलच लढत देतील; काँग्रेस ठाकरेंची मनधरणी करणार!

रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रायगड मतदारसंघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अविश्वास दर्शवला. निवडून आल्यानंतर तटकरे सहकारी मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देतात. मित्रपक्षांना संपवण्यासाठी कारवाया करतात असा आरोप शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या बैठकीत केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही एकत्र आलोत. महायुतीत आम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करू पण लोकसभेनंतरच्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य केले पाहिजे. कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन जर तुमच्यात बदल दिसला नाही तर तुमचा राजकीय कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला.

हे काय! सुनील तटकरे विरोधी बाकांवर; श्रीनिवास पाटलांच्या शेजारी बसून ऐकलं PM मोदींचं भाषण

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज