Lok sabha Election : सांगलीत विशाल पाटीलच लढत देतील; काँग्रेस ठाकरेंची मनधरणी करणार!
Satej Patil On Sangli Lok sabha seat : महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यात काँग्रेस (Congress) आणि भाजपने पहिली उमेदवारी यादी जाहीर केलीय. पण काही जागांवरून महाविकास आघाडीमध्ये मोठा तिढा निर्माण झालाय. त्यातील एक जागा म्हणजे सांगली लोकसभा (Sangli Lok sabha) होय. या जागेचा तिढा असताना उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यातच महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची थेट उमेदवारीच जाहीर केली. त्यानंतरही काँग्रेसच्या नेत्यांनी या जागेवरील दावा सोडलेला नाही. काँग्रेसचे नेते व आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनीही या जागेबाबत अजूनही आम्ही आग्रही असल्याचे म्हटले आहे.
अभिनंदन बाबा! तिकीटासाठी एकदाही दिल्लीला न जाता…; संभाजीराजेंची शाहू महाराजांसाठी भावनिक पोस्ट
सांगलीच्या जागेबाबत सतेज पाटील म्हणाले, सांगली हा मतदारसंघ पारंपरिकरित्या काँग्रेसचा आहे. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा विषयच नव्हता. शेवटी जिंकणे महत्त्वाचे आहे. भाजपचा एक-एक खासदार कमी करणे हे ध्येय आहे. या जागेवर विशाल पाटील हे उमेदवार असतील तर चांगल्या पद्धतीने लढाई करतील. आम्ही या जागेसाठी आग्रही आहोत. काही तरी मार्ग निघेल. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केलेली असली तरी उद्धव ठाकरे यांची मनधरणी करू, या जागेबाबत चर्चा करून मार्ग काढला जाईल.
दरम्यान भाजपने पुन्हा एकदा येथून खासदार संजयकाका पाटील यांनाच उमेदवार दिली आहे. येथून चंद्रहार पाटील हे नवखे उमेदवार दिल्यास संजयकाकांना हे लढत सोपी होऊ शकते. पण विशाल पाटील हे उमेदवार असल्यास तुल्यबळ लढत होऊ शकते.
Loksabha Election : निलेश लंके शरद पवार गटाच्या मेळाव्याला आले पण गुपचूप पळाले !
कोल्हापूरमध्ये शाहू महाराज यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्याबद्दल सतेज पाटील म्हणाले, मी कोल्हापूरकर म्हणून प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानतो. पहिल्या निर्णय एका विचाराने झालेला आहे. स्वतःची सीट अजून प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेली नाही. खऱ्या अर्थाने शाहू महाराजांच्या विचारांना ते पाठबळ देत आहेत.
हातकणंगले शिवसेनेला, उमेदवार कोण ?
हातकणंगलेची जागा शिवसेनाला दिलेली आहे. या जागेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे लढतील. त्यासाठी ते ठाकरे यांना भेटलेले आहेत. त्यांनी येथून लढावे हे मी सहा महिन्यांपासून सांगत आहे. एकास-एक फाईट होण्यासाठी राजू शेट्टी यांना काँग्रेस, राष्ट्रवादी पाठिंबा देईल, असे सतेज पाटिल यांनी स्पष्ट केले.