Loksabha Election : निलेश लंके शरद पवार गटाच्या मेळाव्याला आले पण गुपचूप पळाले !

  • Written By: Published:
Loksabha Election : निलेश लंके शरद पवार गटाच्या मेळाव्याला आले पण गुपचूप पळाले !

Nilesh Lanke attended sharad Pawar  group meeting: आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे लोकसभेसाठी (Loksabha Election) इच्छुक आहेत. त्यांना शरद पवार यांच्या पक्षाकडून अहमदनगरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु अधिकृतपणे त्यांनी शरद पवार (Sharad Pawar)गटात प्रवेश केलेला नाही. गेल्या आठवड्यात ते शरद पवार यांना पुण्यात भेटले. तर आज ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अहमदनगरच्या मेळाव्याला उपस्थित राहिले. ते थेट माध्यमांसमोर आपली भूमिका मांडत असतात. बैठक संपल्यानंतर माध्यमांची नजर चुकवून थेट मागच्या दाराने ते निघून गेले आहेत. त्यामुळे वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.

वसंत मोरे यांचा पोपट झालाय.. पण ते मान्य करेनात!
या बैठकीला लंके यांनी संबोधित देखील केले अशी माहिती मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात मोठ्या हालचाली सुरु आहेत. यातच नगर दक्षिणमधून सुजय विखे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. ते मतदारसंघात फिरत आहेत. मात्र महाविकास आघाडीतून याठिकाणी उमेदवार देण्यात आला नाही. अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटाकडून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहे.

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा शाहू महाराज यांना पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांची घोषणा

या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा पक्ष कार्यालयात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या बैठकीला आमदार निलेश लंके यांच्यासह प्रताप ढाकणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अभिषेक काळमकर यांच्यासह अनेक पदधिकारी उपस्थित होते. दरम्यान लंके हे या मेळाव्याला उपस्थित होते. मेळावा संपताच लंके यांनी गुपचूप राष्ट्रवादी कार्यालयाच्या पाठीमागच्या गेटने बाहेर पडत थेट गाडीतून निघून गेले आहेत. त्याची वेगळीच चर्चा सुरू आहे.

पत्नीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न
सुरुवातीला निलेश लंके हेच लोकसभेसाठी इच्छुक होते. परंतु आता त्यांची पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांचे नाव पुढे येत आहेत. लंके यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढल्यास त्यांच्यावर अजित पवार गटाकडून पक्षांतरबंदीनुसार कारवाई होऊ शकते. ही कारवाई टाळण्यासाठी त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे ते स्वतः पत्नीला उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु शरद पवार गटाचे नेते हे निलेश लंकेंनीच उमेदवारी करावे, या मताचे आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube