Sunil Tatkare : पृथ्वीराज चव्हाणांना ‘राष्ट्रवादी’ विरोधाची ‘सुपारी’; सरकार पाडल्याच्या टीकेवर तटकरे भडकले

Sunil Tatkare : पृथ्वीराज चव्हाणांना ‘राष्ट्रवादी’ विरोधाची ‘सुपारी’; सरकार पाडल्याच्या टीकेवर तटकरे भडकले

Sunil Tatkare replies Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं. जर सरकार कोसळलं नसतं तर राज्यात भाजप कधीच सत्तेत आला नसता आणि मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्नही सुटला असता, अशी टीका राष्ट्रवादीवर केली होती. त्यांच्या या टीकेवर अजित पवार गटाचे नेते चांगलेच भडकले आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे  (Sunil Tatkare) यांनी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

खा. तटकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारले. त्यावर तटकरे म्हणाले, मी आतापर्यंत त्यांना ज्येष्ठ राजकारणी समजत होतो. पण अलीकडच्या काळात त्यांना हा विनोद का सुचतोय हे मला कळलं नाही. 2014 मध्ये मी मंत्रिमंडळात होतो. त्यावेळी राणे समिती नेमली गेली. मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं. पण पुढं उच्च न्यायालयात मात्र ते टिकलं नाही. त्यामुळे 2014 ला सत्ता गेल्यानंतर टिकलं नाही किंवा राष्ट्रवादीत ते टिकलं नाही असं बोलण्यामागे त्यांचा हेतू काय आहे ते मला कळलेलं नाही.

Prithviraj Chavan : सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केलं ही चूकच; चव्हाणांनी अखेर मान्य केलंच

म्हणून आम्ही सरकारमधून बाहेर पडलो 

एक गोष्ट मात्र नक्की आहे की 2014 मध्ये काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीने मागितलेल्या जागांवर पहिले उमेदवार जाहीर केले. मी त्यावेळी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष होतो. आम्हाला गाफील ठेऊन आम्हाला कोणत्या जागा पाहिजेत याची माहिती आमच्याकडून काढून घेतली. आतापर्यंतचा प्रघात आहे की निवडणुकीआधी ज्या दोन राजकीय पक्षांची आघाडी किंवा युती होते. त्यावेळी ती जाहीर झाल्यानंतरच उमेदवार घोषित केले जात असतात. पण पृथ्वीराज चव्हाणांना काही सुपारी देऊनच दिल्लीतून पाठवण्यात आलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम करायचं. त्यामुळेच आमच्यात निवडणुकीआधी युती होऊ शकली नाही. काँग्रेसकडून तसं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर मी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल, तत्कालीन उपमु्ख्यमंत्री अजित पवार आम्ही सगळ्यांनीच वरिष्ठ नेतत्वाशी चर्चा करूनच सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

चव्हाणांमुळेच काँग्रेसचा चौथा नंबर 

ज्या हेतूने पृ्थ्वीराज चव्हाण दिल्लीतून राज्यात आले. आघाडी सरकारची लय बिघडली. आघाडी सरकारमधील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून मी स्व. विलासराव देशमुख यांच्याकडे पाहतो. आघाडी सरकारचा मुख्यमंत्री कसा असावा याचं चांगलं उदाहरण ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दिलं. अशोक चव्हाणांनीही उत्तम काम केलं. पण, पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सतत पाण्यात बघतच त्यांचा कारभार करत आलेले होते. त्याचा परिणाम राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसलाच जास्त भोगावा लागला. आज राज्यात काँग्रेस चौथ्या क्रमांकावर गेली याला कारण कोण असेल तर ते पृथ्वीराज चव्हाण आहेत.

Prithviraj Chavan : मोदी पुन्हा सत्तेत आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाही; चव्हाणांचा दावा

राऊतांनी आमच्याकडं लक्ष देऊ नये 

आम्हाला कुठं डावललं जातय यावर संजय राऊत यांनी लक्ष देण्याची काहीच गरज नाही. त्यांनी त्यांचा पक्ष कसा सावरायचा लोकसभा निवडणुकांना कसं सामोरं जायचं यावर लक्ष दिलं तर बरं होईल. भाजप त्यांची भूमिका मांडण्यात सक्षम आम्ही प्रत्येक राज्यात गेलंच पाहिजे असं काही नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube