Prithviraj Chavan : मोदी पुन्हा सत्तेत आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाही; चव्हाणांचा दावा

Prithviraj Chavan : मोदी पुन्हा सत्तेत आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाही; चव्हाणांचा दावा

Prithviraj Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विधानसभा निवडणुकांबाबत अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी परत आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाहीत असा दावा त्यांनी केला. चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच राज्य आणि केंद्र सरकावर जोरदार टीका केली.

ते पुढे म्हणाले, राज्यात आमची तीन पक्षांची आघाडी आहे. आगामी निवडणुका आम्ही एकत्रच लढणार आहोत. मतदारसंघात एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न राहिल. निवडणुकीतील जागावाटपाचा निर्णय तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून घेतील. यात वाद होतील, मतदारसंघांसाठी घासघीसही होईल. जागावाटपात स्पर्धा होईल पण, भाजप पुन्हा सत्तेत येऊ नये यासाठी एकास एक उमेदवार देऊ असे स्पष्ट करतानाच जर आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी पुन्हा सत्तेत आले तर राज्यात विधानसभा निवडणूकच होणार नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

एक भेट-चर्चा अनेक! राहुल नार्वेकर आणि CM शिंदेंची ‘वर्षा’वर बंद दाराआड खलबतं

आता कोर्टानेच निर्णय घ्यावा 

पक्षांतर बंदी कायदा कुचकामी ठरला आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे की अजूनही निर्णय दिला जात नाही. सुप्रीम कोर्ट हतबल झालं आहे. विधानसभा अध्यक्ष यांनी न्याय निवडा करावा लागतो. सुप्रीम कोर्टने काही ठोस निर्णय घेतला पाहिजे. विधानसभा अध्यक्ष एका पक्षाचा आहे त्यामुळे ते आमदार अपात्रता प्रकरणात लवकर निर्णय देतील असे वाटत नाही.

निधी वाटपात केंद्र सरकारचा भेदभाव 

राज्य आणि केंद्रात अंदाजपत्रक होत तेव्हा निधी वाटप केला जातो. त्याप्रमाणे निधी वाटप होतो कामं होतात. अनेक वेळा ग्रामीण भागात आमदार खासदार यांना दिला जातो. तोंड बघून निधी दिला जातो हे दुर्दैवी आहे. त्यातून आता कोर्ट कचेरी सुरू आहे. जनते समोर जाईल तेव्हा जनता उत्तर देईल. निधीवाटपात केंद्र सरकारकडून भेदभाव केला जात आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. केंद्राचा भेदभाव सुरूच आहे. यावर आता उपाय एकच आहे तो म्हणजे हे सरकार घालवलं पाहिजे असे चव्हाण यांनी सांगितले.

“मग सुप्रियाताईंना हमासकडून लढण्यासाठी का पाठवत नाही?” : भाजप नेत्याचा पवारांना खोचक सवाल

आम्ही आरक्षणासाठी कार्यवाही केली 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही चव्हाण यांनी भाष्य केले. मी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी पहिल्यांदा कार्यवाही करण्यात आली. पण, आरक्षणासाठी गायकवाड आयोगावेळी योग्य टक्केवारी निघाली नाही. त्यामुळे तो प्रश्न मार्गी लागला नाही. आता राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटलाकंडून वेळ मागितला आहे. त्यामुळे आाता पुढं काय घडतंय ते पाहू.

म्हणून बोरवणकरांचा गैरसमज झाला असावा 

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिश्नर या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. बोरवणकर यांनी मागितलेली पोस्टिंग त्यांनी जमीन हस्तांतरणाला विरोध केल्याने मिळाली नसल्याचा पुस्तकात उल्लेख पण तसे काही नाही. त्यावेळी त्यांना हवी ती पोस्ट नव्हती त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला असावा. मला त्यात जास्त काही माहिती नाही. पण, वरिष्ठ पोलीस अधिकारी बदलीत मोठी प्रक्रिया असते. त्यामुळे माझ्याबद्दल त्यांचा गैरसमज झाला असावा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube