विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून बंद, प्रस्ताव आला तर…; शशिकांत शिंदे स्पष्टच बोलले
Shashikant Shinde On NCP : अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा जोराने राज्यातील राजकीय
Shashikant Shinde On NCP : अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा जोराने राज्यातील राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर दुसरीकडे अजित पवार देखील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत होते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यासंबंधित एक लेख लिहित मोठा दावा केला आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र आल्यानंतर पक्षाचे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देण्यात येणार होते असा दावा त्यांनी या लेखात केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी हा दावा चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. तर आता शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी सुनील तटकरे यांना प्रतिउत्तर देत सुनील तटकरे हे सुद्धा पक्षाचे नेते होते, त्यांना माहिती लेख लिहायची काय प्रोसेस आहे असं म्हटलं आहे. तर मोठी माहिती देत आम्ही आता विलीनीकरणाचा विषय बंद केला असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
माध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, विलीनीकरणासाठी आमच्याकडून गडबड नाही, जे बोललो ते सत्य बोललो. आता आम्ही ठरवलं आहे यावर आता भाष्य करायचं नाही. आम्ही स्पष्ट केलं आहे, निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठरणार होते, एकत्र येण्याचे सूत्र कोणते हे नंतर बैठकीत ठरणार होते. त्यांनी एनडीएला विचारावं, त्यांचा पक्षाचा अधिकार आहे, सुनेत्रा वहिणींचा अधिकारी आहे. आम्ही आता जर तर चे विचार करणार नाही, त्यांनी पुढे प्रस्ताव दिला तर स्वीकारायचा की नाही ते ठरवू असं माध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले.
तसेच प्रफुल पटेल (Praful Patel) आणि सुनील तटकरे यांनी विलीनीकरणावर त्यांची भूमिका मांडावी आम्ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा जोमाने उभा करण्यासाठी काम करतोय असं देखील शशिकांत शिंदे म्हणाले.
रोहित पवार यांच्या आरोपांची चौकशी व्हावी
माध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे यांनी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत जे मांडले आहे त्याची चौकशी करण्यात यावी आणि त्याचा अहवाल सादर करण्यात यावा अशी मागणी देखील माध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे यांनी केली.
300 रुपयांचं डोमेन आणि 634 कोटींची ऐतिहासिक डील; AI com ची भन्नाट स्टोरी
