शरद पवारांसह ‘नगर’ मध्ये निलेश लंके यांची जादू संपली? राजकारणातील प्रवास अवघड

Nilesh Lanke : निवडणूक म्हंटले की हार जीत ही सुरूच राहते मात्र अनेक राजकीय नेत्यांना लागोपाठ धक्के हे निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळाले

  • Written By: Published:
Nilesh Lanke

Nilesh Lanke : निवडणूक म्हंटले की हार जीत ही सुरूच राहते मात्र अनेक राजकीय नेत्यांना लागोपाठ धक्के हे निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. याचाच एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अहिल्यानगर मध्ये कधीकाळी शरद पवारांची असलेली जादू हे हळूहळू कमी होताना दिसते. त्याला कारणही तसेच आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांचा शिलेदार निलेश लंके यांनी बलाढ्य सुजय विखे यांना पराभूत करत खासदारकीचा गुलाल उधळला मात्र त्यानंतर विधानसभा निवडणूक तसेच आत्ताच झालेल्या महानगरपालिका निवडणूक मध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठे अपयश आले. यामुळे शरद पवारा पाठोपाठ खासदार निलेश लंकेची जादू जिल्ह्यात संपली आहे की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे त्यामुळे या नेत्यांचा येणाऱ्या काळातील राजकीय प्रवास नक्कीच अवघड असं देखील चित्र दिसत आहे.

2024 च्या लोकसभा निवडणूक जाहीर झाली व त्यावेळेस भाजपकडून (BJP) सुजय विखे (Sujay Vikhe) यांना संधी देण्यात आली तर अनेक दिवस प्रतिस्पर्धी उमेदवार कोण? असेल अशा चर्चा सुरू असताना अचानक अजित पवार गटातून शरद पवार गटात (NCPSP) प्रवेश केलेले निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी खासदारकीच्या रिंगणात उडी मारली. विखे यांना सोपे असलेली ही निवडणूक लंके यांनी अवघड करत जोरदार प्रचार करत अखेर विजयाचा गुलाल उधळला. लंकेच्या या विजयात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात तसेच युवा नेतृत्व रोहित पवार यांचा मोठा सहभाग होता मात्र लोकसभेनंतर विजयाची गणित ही बदलली.

लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक म्हणून निलेश लंके हे समोर आले. अनेक ठिकाणी सहभाग घेऊ लागले, जोरदार भाषण करू लागले. लोकसभेत विधानसभेला ही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार निवडून येतील या हेतूनेच शरद पवारांकडून निलेश लंके यांच्या खांद्यावर उमेदवारांची धुरा सोपवण्यात आली मात्र केवळ महाविकास आघाडीच्या जिल्ह्यात दोन जागा निवडून आल्या यात केवळ कर्जत जामखेड येथे रोहित पवारची जागा निवडून आली यामुळे आघाडीसाठी धोक्याची घंटा ही वाजू लागली होती.

महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का

नुकत्याच झालेल्या अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट याची युती झाली तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे यांची शिवसेनेने या ठिकाणी स्वबळाचा नारा दिला तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडून काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट व उबाटा हे निवडणुकीच्या रिंगणात होते तर मनसे देखील स्वतंत्र निवडणूक लढवत होती मात्र या ठिकाणी युतीने भरघोस यश मिळवत शिवसेनेच्या शिंदे गटाला ही धक्का दिला. तर दुसरीकडे विरोधकांच्या अस्तित्वासाठी सुरू असलेल्या लढाई अक्षरशः विरोधकांचे पानिपत झाले.

निलेश लंके यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटासह काँग्रेसला साधी एकही जागा निवडून आणता आली नाही तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून एक जागेवरती विजय मिळवण्यात यश मिळाले. येणाऱ्या काळात जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका या पार पडणार आहे. त्यामुळे झालेले चुका किंवा विरोधक कुठे कमी पडतात याच्या आत्मचिंतन शरद पवारांसह निलेश लंके यांना करावे लागणार आहे.

इंदापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र अन् घड्याळ चिन्ह फिक्स, अंकिता पाटील दाखल करणार उमेदवारी अर्ज 

तर विजयाची घोडदोड सुरू असलेल्या भाजपाला रोखण्यासाठी मोठी कसरतही पवारांसह लंकेना करावी लागणार आहे. तसेच नगर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीची विस्कटलेली घडी पुन्हा एकसंघ करण्यासाठी खासदार निलेश लंके यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे हे मात्र नक्की.

follow us