पाकिस्तान भारतात विलीन होणार? भाजप नेत्याने केली मोठी भविष्यवाणी
Yogi Adityanath : देशाच्या फाळणीच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी पाकिस्तानबाबत मोठी (Pakistan) भविष्यवाणी केली आहे. एक तर पाकिस्तानचं भारतात विलीनीकरण तरी होईल नाहीतर हा देश जगाच्या नकाशावरून नष्ट तरी होईल असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. भारताचा उद्या स्वातंत्र्यदिन आहे. त्याआधी एक दिवस म्हणजेच 14 ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असतो. याच दिवशी भारताची फाळणी होऊन पाकिस्तान नावाचा देश अस्तित्वात आला होता. फाळणीचा हा दिवस भारतात विभाजन विभिषिका दिवस म्हणून पाळला जातो.
या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ म्हणाले, राजकीय स्वार्थासाठी देशाला विभाजनाच्या संकटात ढकलण्यात आलं. काँग्रेसने सत्तेच्या लोभापायी अशी एक जखम दिली जी आजही दहशतवादाच्या रुपात दंश करतच आहे. 1947 मध्ये ज्या काही घटना घडल्या त्याच घटना आज पुन्हा पाकिस्तान आणि बांग्लादेशात घडत आहेत. पण स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी भारतातीलच काही लोक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
1947 मध्ये तब्बल दहा लाख हिंदू आणि शीख लोकांना ठार मारण्यात आलं होतं. आजही अशाच घटना पाकिस्तान (Pakistan News) आणि बांग्लादेशात (Bangladesh Crisis) घडत आहेत. बांग्लादेशातील दीड कोटी हिंदू लोक आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत असल्याचे योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) म्हणाले.
आपल्या शेजारी देशात या भयानक घटना घडत आहेत. मात्र भारतातील सेक्यूलर लोकं मूग गिळून गप्प बसले आहेत. कमकुवत लोकांच्या बाजूने बोललं तर आपली व्होटबँक नाराज होईल अशी भीती या लोकांना वाटत आहे. या लोकांना फक्त त्यांच्या व्होटबँकेची काळजी आहे. त्यांच्यातील मानवी संवेदनाच संपली आहे अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर केली.
देश काँग्रेसला कधीच माफ करणार नाही
फाळणीच्या शोकांतिकेसाठी काँग्रेस कधीच देशाची माफी मागणार नाही. ज्या ज्या वेळी काँग्रेसला (Congress Party) संधी मिळाली त्या त्या वेळी काँग्रेसने देशाचा गळा घोटण्याचंच काम केलंय. त्यामुळे त्यांनी कधीच माफ केलं जाऊ शकत नाही. बांग्लादेशात कधीकाली 22 टक्के हिंदू होते आज फक्त 7 टक्के राहिले आहेत, याची आठवण योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितांंना करून दिली.
योगींविरोधातील वणव्याला अमित शहांची काडी? उत्तर प्रदेशातील राड्याची Inside Story