भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण? योगी आदित्यनाथ घेणार सरसंघचालक मोहन भागवतांची भेट; अनेक चर्चांना उधाण

भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण? योगी आदित्यनाथ घेणार सरसंघचालक मोहन भागवतांची भेट; अनेक चर्चांना उधाण

Yogi Adityanath Meet Mohan Bhagwat : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातनंतर भारतीय जनता पक्षाला (BJP) सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशमध्ये (UP) बसला आहे. भाजपला यूपीमध्ये 40 पेक्षा कमी जागा मिळाले आहे यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. यातच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ही भेट गोरखपूरमध्ये होणार असून या भेटीमध्ये लोकसभा निवडणूक निकालांबद्दल चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमध्ये लोकसभा निवडणूक निकाल तसेच पुढची रणनीती काय असेल या विषयांवर चर्चा होणार आहे. 3 जुलैपासून गोरखपूरमध्ये प्रशिक्षण वर्ग सुरु होणार असून माहितीनुसार, यामध्ये 280 स्वयंसेवक सहभागी होणार आहे. या प्रशिक्षण वर्गात मोहन भागवत काय बोलणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे कारण लोकसभा निवडणुकीनंतर भागवत यांनी भाजपवर टीका करत मणिपूरचा प्रश्न निकाला लावा सांगितले होते. यामुळे आता या प्रशिक्षण वर्गात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे सरसंघचालक मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांची भेट भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यापूर्वी होत असल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाला आहे.

शाखांची संख्या वाढवली जाणार?

देशात शाखांची संख्या वाढवण्यावर सरसंघचालकांनी जोर दिला असून लोकांपर्यंत संघाचे काम पोहचवण्यासाठी सरसंघचालकांनी सांगितले आहे. नुकतंच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागांवर विजय मिळवता आला आहे तर एनडीएला 292 जागा मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपकडून ‘400 पार’ चा नारा देण्यात आला होता मात्र भाजपला प्रत्यक्षात बहुमत मिळवता आला नाही यानंतर सरसंघचालक मोहन भागवतकडून भाजपवर टीका करण्यात आली होती.

कशी होते भाजप राष्ट्रीय अध्यक्षाची निवड?

येत्या काही दिवसात भाजप नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरु करणार आहे. भाजपच्या घटनेनुसार, नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे करण्यात येते. यामध्ये राष्ट्रीय आणि राज्य परिषदांचे सदस्य असतात.

बोट आढळलेली ‘ते’ आईस्क्रिम पुण्यात तयार झाले? धक्कादायक माहिती आली समोर

जो चार टर्मसाठी सक्रिय सदस्य असते आणि ज्याचे सदस्यत्व 15 वर्षे आहे अशा कोणत्याही व्यक्तीचे नावाचा प्रस्ताव राज्याच्या इलेक्टोरल कॉलेजचे कोणतेही 20 सदस्य देऊ शकतात. मात्र, राष्ट्रीय परिषदेच्या निवडणुका पूर्ण झालेल्या किमान पाच राज्यांमधून संयुक्त प्रस्ताव येणे आवश्यक असते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज