देशाच्या स्यायत्त संस्थांनावर पूर्ण कब्जा…, लोकसभेत राहुल गांधींचा भाजप आरएसएसवर वार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करताना, राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 09T180224.755

आज लोकसभेत निवडणुकांच्या सुधरणा यावर चर्चा झाली. (Loksabha) त्यावर बोलताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट घणाघात केला. देशात मतं चोरी होत आहे. तसंच, निवडणूक आयोगावर थेट नियंत्रण ठेवण्यात आले आहे, निवडणूक आयोग भाजपच्या नियंत्रणाखाली आहे असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

हरियाणात मत चोरीचा आरोप करताना, राहुल गांधी म्हणाले की एका ब्राझिलियन महिलेचा फोटो मतदार यादीत २२ वेळा आला. त्यांनी पुरावे देण्यास आणि त्यांच्या थेट प्रश्नांची उत्तरे देण्यास निवडणूक आयोग अपयशी ठरल्याबद्दल टीका केली, बिहार निवडणुकीनंतर मतदार यादीत १२२,००० डुप्लिकेट फोटो कसे आले असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी असेही म्हटले की हरियाणासह महाराष्ट्रातही मत चोरी सिद्ध झाली आहे.

Video : मोदी जेवढे वर्ष PM तेवढे वर्ष नेहरू देशासाठी तुरुंगात; मोदींना आव्हान देत प्रियंका गांधी थेट नडल्या

राहुल गांधींनी प्रश्न केला की भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) यांना निवडणूक आयुक्तपदावरून का काढून टाकण्यात आलं? जर पंतप्रधान आणि गृहमंत्रीच राहिले तर त्यांच्या आवाजाचे काय मूल्य राहील? पंतप्रधान मोदी आणि अमित शहा स्वतःचे निवडणूक आयुक्त का निवडू इच्छितात? सीसीटीव्ही कायदा का बदलला गेला आहे? हा डेटा नव्हे तर निवडणुका चोरण्याचा खेळ आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना ताब्यात घेण्याचा खेळ काय आहे असंही ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करताना, राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. यामुळे सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला. सभापती ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना निवडणूक सुधारणांवर चर्चा करण्यास सांगितलं आणि कोणत्याही संघटनेचे नाव न घेण्यास सांगितलं. दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे ऐकण्यासाठी सर्वजण उपस्थित होते. जर ते या विषयावर बोलत नसतील तर ते सर्वांचा वेळ का वाया घालवत होते?

follow us