LokSabha Election Result : मुंबईत कॉंग्रेस अन् ठाकरेंचा दबदबा; शिंदे-भाजपने दोनच जागा राखल्या
LokSabha Election Result MVA won Mumbai : भाजपाने लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिला होता. मात्र ते स्वप्न निकालाच्या दिवशी पूर्ण झालेलं नाही. त्यात महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना झाला. यामध्ये काँटे की टक्कर झाली. तर मुंबईचा गड राखणे महायुती ( Mahayuti ) आणि महाविकास आघाडीसाठी ( MVA) महत्त्वाचं होतं. त्यामध्ये 2019 च्या निवडणुकीत मुंबईतील सर्व जागा भाजप आणि शिवसेनेच्या युतीने जिंकल्या होत्या. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. कारण मुंबईतील सहा पैकी दोन जागा ठाकरेंच्या शिवसेनेने तर दोन कॉंग्रेसने जिंकल्या आहेत. तर शिंदे आणि भाजपला मुंबईत केवळ एक एक जागा राखता आली आहे.
कुठे चुरशी तर कुठे एकहाती झाली लढत…
दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाईं यांनी विजय मिळवत महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंसाठी पहिला विजय खेचून आणला. त्यांनी शिंदेंच्या विद्यमान खासदार राहुल शेवाळेंचा ( Rahul Shewale ) तब्बल 53384 मतांनी पराभव केला आहे. दक्षिण मध्य मुंबईची लढत शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची लढाई होती. कारण याच भागामध्ये शिवसेनेचे पक्ष कार्यालय आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे येथील खासदार राहुल शेवाळे हे पक्ष फुटीनंतर शिंदेंसोबत गेले आहेत.
महायुतीचा फुगा फुटला ! मविआला सर्वाधिक जागा, गेल्या वेळी एक जागा जिंकणारा काँग्रेस ‘बिग बॉस’
मुंबईत इतर ठिकाणी महाविकास आघाडी म्हणजे कॉंग्रेस-ठाकरे आघाडीवर असताना उत्तर-मुंबईचा गड भाजपच्या पियुष गोयल ( Piyush Goyal ) यांनी राखला आहे. त्यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील ( Bhushan Patil ) यांचा तब्बल 357608 मतांनी पराभव केला आहे. मुंबईतील लोकसभेची जागा उत्तर मुंबई ही भाजपासाठी सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. कारण 2004 आणि 2009 चा काँग्रेसला मिळालेल्या विजयाचा अपवाद सोडता. 1989 पासून लागोपाठ भाजपने उत्तर मुंबईचा गड राखला आहे. मात्र यावेळी भाजपकडून दोन वेळा खासदार राहिलेला गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना मैदानात उतरवलं होतं. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे या मतदारसंघात देखील मराठी अमराठी किंवा बाहेरून आलेला उमेदवार अशा प्रकारचा प्रचार महाविकास आघाडीकडून केला गेला.
विदर्भात महायुतीला दे धक्का! दहा पैकी सात जागांवर ‘मविआ’चा दणदणीत विजय
पश्चिम मुंबईत मात्र ठाकरेंचा तिसरा विजय हातून निसटला आहे. कारण ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर ( Amol Kirtikar ) 2 हजार मतांनी विजयी झाले होतो. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर ( Ravindra Vaikar ) यांचा पराभव केला होता. मात्र येथे कमी मतांची आघाडी असल्याने वायकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. ज्यामध्ये कीर्तिकरांच्या हातून विजय निसटला. तर वायकर यांनी केवळ 43 मतांनी शिंदेंचा गड राखला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात मविआने युतीला पाणीच पाजलं! सोलापूर, सांगली, अन् कोल्हापुरात दे धक्का…
दुसरीकडे अटीतटीचा सामना झालेल्या उत्तर-मध्य मुंबईत कॉंग्रेसने भाजपला अक्षरशः काटे की टक्कर देत धूळ चारली आहे. भाजपचे उज्ज्वल निकम ( Ujjval Nikam ) यांना कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad ) यांनी पराभूत केलं आहे. या लढतीत निकम हे केवळ 176 मतांनी पराभूत झाले आहेत. त्यामुळे वर्षा गायकवाडांचा हा विजय अगदी निसटता विजय मानला जात आहे.
Loksabha Election Result : भाजप न हारले न जिंकले; 400 पारची गणितं कुठे आणि कशी चुकली?
मुंबईतील आणखी एक मतदारसंघ जेथे ठाकरेंनी शिंदेंचा दारूण पराभव केला तो म्हणजे दक्षिण मुंबई. पुर्वीच्या शिवसेनेने आणि आता ठाकरे गटाने ही जागा तिंसऱ्यांदा जिंकत शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव ( Yamini Jadhav ) यांचा 52673 मतांनी पराभव केला आहे. त्यात त्यात ठाकरेंच्या अरविंद सावंत यांनी सलग तिसऱ्यांदा हा विजय मिळवला आहे. शिवसेनेतील पक्ष फुटीसह या मतदारसंघात इतर घटक देखील तेवढेच महत्त्वाचे ठरले. ते म्हणजे या मतदारसंघात जवळपास 25% मुस्लिम मतदार आहेत. जे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. तर महायुतीचे भाजप आणि शिंदे यांची शिवसेना या जागेसाठी गुजराती आणि मारवाडी तसेच इतर उत्तर भारतीय मतदारांवर अवलंबून होते. मात्र आता महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम मतदारांसह हा गड राखण्यात यश आलं आहे.
मुंबईमध्ये नेहमीच चर्चेत असलेला मराठी आणि अमराठी भाषिकांचा मुद्दा या मतदारसंघातील ध्रुवीकरणाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यात याच मुद्द्यावरून भाजपला उत्तर-पूर्व मुंबई महायुतीतील भाजपला हा मतदारसंघ राखण्यात अपयश आलं आहे. भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा कॉंग्रेसच्या संजय पाटील यांनी 29861 मतांनी पराभव केला आहे. या ठिकाणी गुजराती विरुद्ध मराठी असा सामना रंगला आहे. दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका गुजराती सोसायटीमध्ये मराठी लोकांना राहण्याची परवानगी दिली जात नसल्याचे मुद्द्यावरून वाद निर्माण करण्यात आला होता. याचा फायदा ठाकरे गटाला झाला.